सांस्कृतिक मंत्रालय
केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल मोरेश्वर पाटील यांनी राष्ट्रीय संस्कृती महोत्सवाला दिली भेट
"आझाद मैदानावर देशभरातील कलाप्रकारांना स्थान देण्यात आले असून आपल्या देशाची संस्कृती खऱ्या अर्थाने आझाद झाली आहे" - कपिल पाटील
Posted On:
14 FEB 2023 9:13PM by PIB Mumbai
मुंबई, 14 फेब्रुवारी 2023
मुंबईतील फोर्ट परिसर कार्यालये आणि व्यावसायिक जागांसाठी ओळखला जातो. मात्र 11 ते 19 फेब्रुवारी 2023 दरम्यान आयोजित राष्ट्रीय संस्कृती महोत्सव 2023 साठी फोर्टमधील आझाद मैदान सज्ज झाले आहे. शानदार उद्घाटन सोहळ्यानंतर, हा महोत्सव आता विनामूल्य असून सर्वाना भेट देता येणार आहे.
राष्ट्रीय संस्कृती महोत्सव 2023 च्या तिसऱ्या दिवशी म्हणजे 13 फेब्रुवारी 2023 रोजी केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल मोरेश्वर पाटील सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते. .आझाद मैदानावर उपस्थितांना आणि माध्यमांना संबोधित करताना ते म्हणाले, “ आपल्या सांस्कृतिक परंपरांमुळे आपला देश एकसंध आणि महान आहे. साधारणपणे कला आणि संस्कृतीचे जाणकार त्याच्या शोधात असतात. मात्र सांस्कृतिक मंत्रालयाने कला आणि संस्कृती या रसिकांपर्यंत आणली आहे. आझाद मैदानावर देशभरातील कलाप्रकाराना स्थान देण्यात आले असून आपल्या देशाची संस्कृती खऱ्या अर्थाने आझाद झाली आहे"
पाटील यांनी संपूर्ण महोत्सवाची पाहणी केली आणि तिसर्या दिवशी सादर होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांचाही आनंद घेतला.
तिसर्या दिवसाची म्हणजे 13 फेब्रुवारी 2023 ची काही क्षणचित्रे पुढीलप्रमाणे:











आज संध्याकाळी सादर होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये प्रसिद्ध गायक आनंद भाटे शास्त्रीय आणि भक्तिसंगीताचा अप्रतिम संगम असलेले मराठी अभंग सादर करणार आहेत. आपल्या दमदार आवाजाने आणि मंचावरील मंत्रमुग्ध करणाऱ्या उपस्थितीने, आनंद भाटे प्रेक्षकांवर अमीट ठसा उमटवतील यात शंका नाही. आज आजची संध्याकाळ दिग्गज कलाकार अन्नू कपूर यांच्या उपस्थितीने अविस्मरणीय होईल. आपल्या भावपूर्ण आवाजासाठी आणि अनोख्या शैलीसाठी ओळखले जाणारे अन्नू कपूर भारतीय लोकसंगीत आणि चित्रपट संगीताचे मर्म जिवंत करतील.
सांगीतिक कार्यक्रमांव्यतिरिक्त , या महोत्सवाला भेट देणाऱ्यांना भारतातील पारंपारिक कला, हस्तकला आणि खाद्यपदार्थांचे दर्शन घडवणाऱ्या प्रदर्शनाला भेट देता येईल. या प्रदर्शनात देशभरातील कलाकार, कारागीर यांच्या कलाकृती असून भारताच्या समृद्ध वारशाचे कौतुक करण्याची संधी मिळेल.
त्यामुळे, तुम्ही संगीत, नृत्य, कला किंवा इतिहासाचे चाहते असलात तर प्रत्येकासाठी इथे काहीतरी आहे. भारतातील काही प्रतिभावान कलाकारांचे सादरीकरण पाहण्याची ही संधी गमावू नका , कारण ते केवळ तुमच्यासाठी भारताचा सांस्कृतिक वारसा जिवंत करण्यासाठी एकत्र आले आहेत.
S.Patil/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1899228)
Visitor Counter : 150