सहकार मंत्रालय
G20 महिला संचलित विकास: मध्य प्रदेशात ग्वाल्हेर येथे "महिला सक्षमीकरण आणि महिला पोषण" या विषयावर, महिला सहकारी क्षेत्रावर लक्षं केंद्रीत करुन, जागृती आणि प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला
Posted On:
11 FEB 2023 11:38AM by PIB Mumbai
केंद्रीय सहकार मंत्रालयाच्या, म पुणे येथील, वैकुंठ मेहता भ सहकार व्यवस्थापन संस्थेनं, मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथील लक्ष्मीबाई महिला नागरी सहकारी बँकेच्या सहकार्यानं "कार्यक्रम सक्षमीकरण आणि महिला पोषण" या विषयावर, जनजागृती सह प्रशिक्षण कार्यक्रम राबवला. मध्यप्रदेशात ग्वाल्हेर इथं 10 फेब्रुवारी 2023 रोजी इथे हा अर्ध दिवस कार्यक्रम झाला.
महिला सहकारी बँकेचे सदस्य आणि शेतकऱ्यांसाठी G20 संकल्पनेवर आधारीत या कार्यक्रमाचं आयोजन, वैकुंठ मेहता भारतीय सहकार व्यवस्थापन संस्थेनं (VAMNICOM केलं होतं.

VAMNICOM, पुणे च्या संचालक डॉ. हेमा यादव यांच्या मार्गदर्शनाखाली महिला संचलित विकास (महिलांनी घेतलेला पुढाकार आणि सहभाग यामधून साधला जाणारा विकास) या G20 संकल्पनेवर हा कार्यक्रम होता. सहकार क्षेत्रातील महिलांसाठी G20 संकल्पनेवर आधारीत कार्यक्रम आयोजित करणं, हा यामागील उद्देश होता. VAMNICOM ने मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथील लक्ष्मीबाई महिला नागरी सहकारी बँकेचं यासाठी सहकार्य घेतलं आहे. 1960 पासून ही सहकारी बँक कार्यरत आहे. लक्ष्मीबाई महिला बँकेच्या संस्थापक अध्यक्ष अलका श्रीवास्तव यांनी कार्यक्रम आयोजित करण्यात मोठा पुढाकार घेतला.
कार्यक्रमात ग्वाल्हेर शहरातील विविध भागातून 150 महिला सहभागी झाल्या होत्या. माजी मंत्री आणि खासदार माया सिंह प्रमुख पाहुण्या, तर महिला आरोग्य तज्ञ मीना मुधा, विशेष निमंत्रित होत्या.
माया सिंह यांनी महिला सक्षमीकरण आणि समाजाच्या विकासात महिलांची भूमिका याविषयी आपलं मत व्यक्त केलं. मीना मुधा यांनी आपल्या भाषणात शरिरातील लोह, कॅल्शियम सह विविध प्रकारच्या कमतरतांबद्दल मार्गदर्शन केलं.

VAMNICOM, पुणेच्या डॉ. पल्लवी इंगळे यांनी महिला संचलित विकासाची G20 संकल्पना आणि कार्यक्रमाची संक्षिप्त रुपरेषा सादर केली. महिलांना आधार देण्यात लक्ष्मीबाई महिला सहकारी बँकेचं योगदान, लक्ष्मीबाई महिला बँकेच्या संस्थापक अध्यक्ष अलका श्रीवास्तव यांनी स्पष्ट केलं. डॉ. अमित मुदगल (ICM, भोपाळ) यांनी महिला शेतकऱ्यांची ओळख, महत्व आणि विविध सरकारी योजना याबाबत सांगितलं.
डॉ. प्रियदर्शनी श्रीवास्तव यांनी आपल्या भाषणात किशोरवयीन मुली आणि महिलांच्या पोषणावर भर दिला. महिलांच्या जीवनातील विविध टप्प्यांमध्ये पोषणाचा अर्थ काय असतो आणि पोषणाचं महत्त्व कसं असतं याबाबत माहिती विशद केली. महिलांचं आरोग्य आणि महिलांसमोरील आव्हानं, याबाबत डॉ. वीणा प्रधान यांनी ऊहापोह केला. अंजली बत्रा यांनी महिलांना प्रेरणा देणाऱ्या यशस्वी महिला उद्योजकांची अनेक उदाहरणं सांगितली. व्यवसायाची संधी आणि व्यवसाय विषयक कल तसच गुणवत्ता कशा ओळखाव्यात याबद्दल त्यांनी क्लृप्त्या सांगितल्या.
या कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद आणि कार्यक्रम आवडल्याची पोचपावती मिळाली. महिलांनी व्यवसाय आणि पोषण याविषयी अधिक जाणून घेण्याबाबत मोठ्या प्रमाणावर स्वारस्य दाखवलं.
***
M.Iyengar/A.Save/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1898301)
Visitor Counter : 195