महिला आणि बालविकास मंत्रालय

मंत्रालय दिनांक 11 ते 12 फेब्रुवारी दरम्यान आग्रा येथे जी-20 एम्पॉवर समूहाची स्थापना घेणार बैठक

Posted On: 10 FEB 2023 11:51AM by PIB Mumbai

महिलांच्या आर्थिक प्रतिनिधित्वाचे सक्षमीकरण आणि प्रगतीसाठी एकत्र संघटन (EMPOWER) हे जी- 20 देशांतील उद्योगधुरीण आणि सरकार यांचे एकत्रित संघटन आहे, ज्याचा उद्देश खाजगी क्षेत्रातील महिलांचे नेतृत्व आणि सक्षमीकरणाला गती देणे हा आहे.


"जी-20 एम्पायरचे(EMPOWER) उद्दिष्ट, जी-20 देशांमधील महिलांचे नेतृत्व आणि सक्षमीकरणाला याला गती देण्यासाठी व्यवसाय आणि सरकार यांच्या मधील सर्वात समावेशक आणि कृतीशील दुवा बनणे"हे  आहे.


भारताचे G20 अध्यक्षपद हे महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सर्वसमावेशक, न्याय्य, महत्त्वाकांक्षी, निर्णायक आणि कृती-केंद्रित असे व्यासपीठ आहे.


भारताच्या अध्यक्षतेखालील जी-20 एम्पावर (EMPOWER) 2023 हे व्यासपीठ महिलांच्या विकासाकडून महिलांच्या नेतृत्वाखालील विकासाकडे वळण्यास प्राधान्य देत आहे. महिलांच्या नेतृत्वाखालील उद्योजकतेकडे वळणाच्या आव्हानांना संधींमध्ये रूपांतरित करणे आणि कर्मचार्‍यांमध्ये अधिक महिलांना समाविष्ट करून घेणे हे परिवर्तन त्यातून अपेक्षित आहे.


केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्रालय हे जी-20 एम्पावरसाठी (EMPOWER)भारतातील विभागीय मंत्रालय आहे.  अपोलो हॉस्पिटल्स एंटरप्रायझेस लिमिटेडच्या संयुक्त व्यवस्थापकीय संचालक, संगिता रेड्डी, या भारताच्या जी-20 अध्यक्षपदाच्या काळात एम्पावर EMPOWER 2023 च्या अध्यक्ष आहेत. भारताच्या जी-20 अध्यक्षतेखाली, एम्पावरच्या (EMPOWER) फेब्रुवारी, एप्रिल आणि जून 2023 मध्ये अनुक्रमे आग्रा, तिरुवनंतपुरम आणि भोपाळ येथे तीन बैठका आयोजित करण्यात येणार आहेत.

या बैठकींमधील चर्चेतून निर्माण होणारी संकल्पनांविषयक सहमती जी-20 EMPOWER 2023 साठी सामाईक घोषणापत्राचा भाग असेल आणि ही माहिती जी-20 नेत्यांकडे शिफारसीसाठी पाठवली जाईल.

समान सहभाग आणि आर्थिक सक्षमतेसाठी,तळागाळातील महिलांनी नेतृत्व हाती घेऊन कार्य करण्यासाठी सहभाग वाढवून महिला सक्षमीकरण घडवून आणणे यावर जी-20 एम्पावर-2023 लक्ष केंद्रित करेल, तीन लक्ष केंद्रित केलेल्या क्षेत्रांमध्ये डिजिटल कौशल्य ही महत्त्वाची संकल्पना असेल.

उद्या आणि परवा 11 आणि 12 फेब्रुवारी रोजी उत्तर प्रदेशातील आग्रा येथे होणार्‍या सुरुवातीच्या बैठकीत जी-20 राष्ट्रे, अतिथी देश, आंतरराष्ट्रीय संस्था आणि खाजगी क्षेत्रातील महिला नेत्यांचे स्वागत केले जाईल. “महिलांचे सर्व क्षेत्रांमधील नेतृत्व सक्षम करण्यासाठी: डिजिटल कौशल्य आणि भविष्यातील कौशल्यपूर्णत्वासाठी भूमिका”ही या बैठकीची संकल्पना आहे

महिला व बाल विकास आणि अल्पसंख्याक व्यवहार मंत्री, श्रीमती.  स्मृती झुबिन इराणी या सुरुवातीच्या सभेचे अध्यक्षस्थान भूषवतील आणि स्वागत करतील आणि उद्घाटन सत्रात महिलांच्या नेतृत्वाखालील विकासाविषयी त्यांचे मौल्यवान विचार सामायिक करतील.  इटलीतील महिला सक्षमीकरणावरील पहिल्या जी-20 मंत्रिमंडळ बैठकीत, परस्पर सहकार्याद्वारे लिंग आणि महिला-केंद्रित समस्यांचे निराकरण करण्याच्या भारताच्या वचनबद्धतेची श्रीमती इराणी यांनी ग्वाही दिली होती.  बाली येथील जी-20 महिला मंत्रिमंडळ बैठकीत, माननीय मंत्र्यांनी महिलांच्या सर्वांगीण विकासाकडे नेणाऱ्या तंत्रज्ञानाचा लाभ घेण्यासाठी भारताने घेतलेल्या "परिवर्तनात्मक" उपाययोजना आणि महिलांच्या विकासाकडून महिलांच्या नेतृत्वाखालील विकासाकडे जाण्याचा भारताचा प्रवास सामायिक केला होता.  बाली इंडोनेशिया येथे जी-20 एम्पावर (EMPOWER) -2022 च्या समारोप समारंभात माननीय मंत्र्यांनी डिजिटल कौशल्यातील  लैंगिक अंतर भरून काढण्याची आणि स्टेम (STEM), कृत्रिम बुद्धिमत्ता ( AI) यांतील  भविष्यातील कौशल्यांमध्ये महिलांचा सहभाग वाढवण्याची गरज अधोरेखित केली.

महिला आणि बाल विकास मंत्रालय आणि आयुष मंत्रालयाचे  राज्यमंत्री, डॉ. मुंजपारा महेंद्रभाई हे देखील भारतातील महिला सक्षमीकरण उपक्रमांबद्दल या मेळाव्यात प्रबोधन करतील.

भारताचे जी-20 शेर्पा श्री अमिताभ कांत भारताचे जी-20 शेर्पा म्हणून एम्पावर (EMPOWER) 2023 बद्दल त्यांचे विचार प्रकट करणार आहेत.  महिला आणि बाल विकास मंत्रालयाचे सचिव श्री इंदेवर पांडे, जी-20 सचिवालय, भारत सरकार आणि उत्तर प्रदेश राज्य सरकार यांतील वरिष्ठ अधिकारी देखील या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

एम्पावर (EMPOWER) 2023 चे संकेतस्थळ भारताच्या जी-20 अध्यक्षपदादरम्यान सर्व एम्पावर  EMPOWER उपक्रमांची आणि लक्ष्यित क्षेत्रांची माहिती देण्यासाठी संसाधन केंद्र म्हणून काम करेल.'यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता' म्हणजेच जेथे महिलांचा सन्मान केला जातो तेथे देवत्व प्रकट होते,हा सांस्कृतिक आणि सभ्यतेला पुढे नेणारा 

 एम्पावरचा (EMPOWER)संदेश लोकांपर्यंत पोहोचवणे हे संकेतस्थळाचे उद्दिष्ट आहे - 


*******

Gopal C/Sampada/CYadav


Release ID: 1897872

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1897924) Visitor Counter : 242