दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय

52 वी पेंशन अदालत

Posted On: 09 FEB 2023 4:05PM by PIB Mumbai

नागपूर, 9 फेब्रुवारी  2023

 

मुख्य पोस्टमास्टर जनरल, महाराष्ट्र सर्कल, मुंबई द्वारे टपाल विभागाच्या निवृत्तीवेतनधारकसाठी/ कुटुंब निवृत्तीवेतनधारकसाठी 52 वी पेंशन अदालत दिनांक 16.03.2023 रोजी 11.00 वाजता मुख्य पोस्टमास्टर जनरलचे कार्यालय , महाराष्ट्र सर्कल, मुंबई येथे आयोजित केली आहे.

निवृत्तीवेतनधारकांच्या लाभाशी संबंधित तक्रारी, जे टपाल विभागातून निवृत्त झाले आहेत/ ज्यांची सेवेत असताना मृत्यू झालेली आहे, टपाल विभाग, महाराष्ट्र आणि गोवा राज्यांचे निववृत्तीधारक ज्यांचे ३ महिन्याच्या आत पूर्तता झालेली नाही अशा प्रकरणांचा डाक पेंशन अदालत मधे विचार केला जाईल.

पेंशन अदालत मधे पुर्णपणे कायदेशीर मुद्द्यासह प्रकरणे ई. वारसा प्रमाणपत्र, कल्पित पेंशन, तीबीओपि/एमएसीपी पदोन्नती, वेतनश्रेणी वाढविणे आणि धोरणात्मक बाबींसह शिस्तभंगाच्या आणि डी .पी.सी.  च्या पुनरावलोकनासाठी प्रलंबित  प्रकरनांचा विचार केला  जाणार  नाही. निवृत्तीवेतनधारक खाली दिलेल्या प्रपत्रामध्ये आपले अर्जाचे तिप्पट प्रती  वरिष्ठ लेखा अधिकारी/ सचिव, पेंशन अदालत, मुख्य पोस्टमास्टर जनरल कार्यालय, महाराष्ट्र सर्कल, मुंबई जीपीओ भवन, दूसरा मजला, मुंबई -400 001 ला 15.02.2023 रोजी किंवा यापूर्वी वैयक्तिक रूपाने(तक्रारींची मोठ्या प्रमाणात/इतरांच्या वतीने नाही) पाठवू शकता. 15.02.2023 च्या नंतर मिळालेल्या अर्जावर पेंशन अदालतमध्ये विचार करण्यात येणार नाही.

पुढे, पोस्टमास्टर जनरल नागपुर क्षेत्र नागपुर-440010 द्वारा दिनांक 02.03.2023  ला 11.30 वाजता, पोस्टमास्टर जनरल नागपुर यांचे कार्यालय, डाक सदन, पहिला माळा, शंकरनगर डाकघर बिल्डिंग नागपुर -440010 ईथे 52 व्या पेंशन अदालतचे आयोजन करण्यात आले आहे. निवृत्तीवेतनधारक खाली दिलेल्या प्रपत्रामध्ये आपले अर्ज, पोस्टमास्टर जनरल नागपुर क्षेत्र नागपुर-440010 ला 24.02.2023 रोजी किंवा यापूर्वी पाठवू शकतात. 24.02.2023 च्या नंतर मिळालेल्या अर्जावर पेंशन अदालतमध्ये विचार करण्यात येणार नाही.

भारतीय डाक विभाग

डाक पेंशन अदालतच्या अर्जाचा फॉर्म

अनुक्रमांक                    

विषय

वैयक्तिक/ निवृत्तीवेतनधारक अन्वेये भरण्यात येणारे तपशील 

1     

निवृत्ती/मृत्युच्यावेळी पादनामसह निवृत्तीवेतनधारकाचे नाव

 

2     

कार्यालयाचे नाव जिथून निवृत्त झाले आहेत आणि निवृत्तीची तारीख

 

3   

पीपीओ

 

4

पोस्ट ऑफिसचे नाव जिथे पेंशन घेतली जात आहे

 

5

निवृत्तीवेतनधारकाचा पोस्टाचा पत्ता (दूरध्वनी सोबत, जर असेल तर )

 

6

थोडक्यात तक्रार (जर आवश्यकता असेल तर तपशीलासह अर्ज जोडा )

 

7

व्यक्ति / निवृत्तीवेतनधारकाची सही आणि दिनांक

 

PIB Nagpur/PM

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1897685) Visitor Counter : 137


Read this release in: English