रेल्वे मंत्रालय
azadi ka amrit mahotsav g20-india-2023

जानेवारी 2023 पर्यंत 1724 किमी समर्पित मालवाहतूक मार्गिका सुरु


दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि हावडा यापूर्वीच विद्यमान भारतीय रेल्वे जाळ्याशी संलग्न

Posted On: 08 FEB 2023 5:40PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 8 फेब्रुवारी 2023

रेल्वे मंत्रालयाने  लुधियाना ते सोननगर (1337  किमी) ही पूर्व समर्पित मालवाहतूक मार्गिका  (ईडीएफसी) आणि जवाहरलाल नेहरू पोर्ट टर्मिनल (जेएनपीटी) ते दादरी (1506 किमी) ही पश्चिम समर्पित मालवाहतूक मार्गिका (डब्लूडीएफसी ) या दोन समर्पित मालवाहतूक मार्गिकांचे  (डीएफसी ) बांधकाम हाती घेतले आहे.  ईडीएफसीवर 861 किमी आणि डब्लूडीएफसीवर 863 किमी  बांधकाम  पूर्ण झाले आहे.

2014 आणि 2022 मधील या दोन्ही समर्पित मालवाहतूक मार्गिकांच्या  आर्थिक आणि प्रत्यक्ष  प्रगतीचे तुलनात्मक चित्र खालीलप्रमाणे आहे:-

Description

Status as on 1st Mar 2014

Status as on 31st Jan.2023

Physical Progress

Nil

1724 Km commissioned

Expenditure including land

Rs. 10,357 crore

(FY 2013-14)

Rs. 97,957 crore

(upto Decmeber 2022)

समर्पित मालवाहतूक मार्गिका औद्योगिक व्यवहारांना  प्रोत्साहन देतील आणि नवीन औद्योगिक केंद्र  आणि वसाहतींच्या   विकासाला चालना देतील.वाणिज्य मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या राष्ट्रीय औद्योगिक मार्गिका महामंडळ  (एनआयसीडीसी ) एकात्मिक औद्योगिक वसाहतीच्या  विकासासाठी मार्गिका विकसित   करण्यासह अनेक  प्रकल्प राबवत आहे. नवीन ,मालवाहतूक  टर्मिनल्स, मल्टीमॉडल लॉजिस्टिक पार्क्स आणि देशांतर्गत कंटेनर डेपोच्या विकासामुळे लॉजिस्टिक क्षेत्राला फायदा होईल यामुळे  प्रकल्प-प्रभाव क्षेत्रात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होईल.
 
दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि हावडा यापूर्वीच  विद्यमान भारतीय रेल्वे जाळ्याशी  जोडलेले आहेत. समर्पित मालवाहतूक मार्गिका  प्रकल्प सुरू झाल्याने दिल्ली, मुंबई आणि हावडा या क्षेत्राची कनेक्टिव्हिटी आणखी बळकट होईल.

रेल्वे, दळणवळण आणि इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री  अश्विनी वैष्णव यांनी आज लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.

 
S.Kane/S.Chavan/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai(Release ID: 1897409) Visitor Counter : 106


Read this release in: English