मत्स्योत्पादन, पशुविकास आणि दुग्धविकास मंत्रालय
जागतिक पातळीवरील दूध उत्पादनात 24% चे योगदान देत भारत प्रथम स्थानी
Posted On:
07 FEB 2023 7:11PM by PIB Mumbai
अन्न आणि कृषी संघटनेच्या कॉर्पोरेट सांख्यिकी डेटाबेस (एफएओएसटीएटी) मधील उत्पादनविषयक माहितीनुसार, भारत हा जगातील सर्वात मोठा दूध उत्पादक देश ठरला आहे. वर्ष 2021-22 मध्ये जागतिक पातळीवरील दूध उत्पादनात 24% चे योगदान नोंदवत भारताने या क्षेत्रात प्रथम क्रमांक पटकावला आहे.
वर्ष 2014-15 ते 2021-22 अशा गेल्या आठ वर्षांच्या कालावधीत, भारतातील दूध उत्पादनात 51% ची वाढ नोंदवण्यात आली असून वर्ष 2021-22 मध्ये देशातील दूध उत्पादन बावीस कोटी टनांपर्यंत वाढले आहे.
केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुपालन तसेच दुग्धविकास मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांनी आज लोकसभेत लेखी उत्तराद्वारे ही माहिती दिली.
***
N.Chitale/S.Chitnis/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1897155)
Visitor Counter : 527