संरक्षण मंत्रालय
पुण्याजवळच्या चाकण येथील संरक्षण दलासाठी साहित्य सामुग्री उत्पादन करणाऱ्या खाजगी कंपनीला चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ यांची भेट
Posted On:
07 FEB 2023 6:40PM by PIB Mumbai
पुणे, दि. 7-02-2023
चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान (PVSM, UYSM, AVSM, SM, VSM) यांनी आज, 07 फेब्रुवारी 23, रोजी पुण्याजवळच्या चाकण, येथील निबे लिमिटेड या संरक्षण दलासाठी साहित्य सामुग्री उत्पादन करणाऱ्या खाजगी कंपनीला भेट दिली. याप्रसंगी निबे लिमिटेडच्या दुस-या वर्धापनदिनानिमित्त ‘निबे डेफ- एक्स्पो, 2023’ या निवडक संरक्षण उत्पादनांचे आणि एमएसएमई उत्पादनांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. या प्रदर्शनालाही सीडीएस यांनी सेच निबे कंपनीच्या एका नवीन उत्पादन प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. निबे डिफेन्स लिमिटेड ही बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमधील सूचीबद्ध कंपनी असून, कंपनीचा चाकण येथे संरक्षण उप-प्रणाली निर्मितीचा प्रकल्प आहे.
कंपनीमध्ये संरक्षण विषयक विविध प्रकारची सामुग्री, तसेच नेव्हल स्ट्रक्चर, स्टोअरेज टॅंक अशा लष्कराला लागणा-या उत्पादनांची निर्मिती करण्यात येते. तसेच शस्त्रास्त्र कार्यप्रणालीसाठी लागणा-या यंत्रांची इलेक्ट्रीक वाहनांची निर्मिती येथे केली जाते.
संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरतेवर भर देण्यात आला आहे आणि एमएसएमई क्षेत्राला आणखी प्रोत्साहन देण्यात येत असल्याचे सीडीएस चौहान यांनी यावेळी बोलताना सांगितले. ते म्हणाले, ‘संरक्षण, संशोधन आणि विकास तसेच शस्त्रास्त्रांच्या निर्मितीमध्ये देशाला आत्मनिर्भर होणे आवश्यक आहे. आत्मनिर्भर झाल्यानंतर भारताला आपल्या संरक्षण गरजांच्या पूर्ततेसाठी इतर देशांवर अवलंबून राहावे लागणार नाही.’
***
M.Iyengar/S.Bedekar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1897140)
Visitor Counter : 164