संरक्षण मंत्रालय

भारतीय सैन्यदलात ‘अग्नीपथ’ योजनेअंतर्गत 10 फेब्रुवारीपासून भरती प्रक्रिया

Posted On: 07 FEB 2023 6:17PM by PIB Mumbai

 

अग्नीपथ योजनेअंतर्गत नव्या पद्धतीने दोन टप्प्यात सैन्य भरती केली जाणार आहे. अग्नीवीर भरती प्रक्रिया-2023-24 साठीच्या संयुक्त प्रवेश परीक्षेच्या नोंदणीसाठी पोर्टल 10 फेब्रुवारी ते 11 मार्च 2023 दरम्यान खुले राहणार आहे. महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील तर गोव्यातील दक्षिण गोवा आणि उत्तर गोवा या जिल्ह्यातील अविवाहीत पात्र युवकांनी अर्ज करावा, असे आवाहन कोल्हापूर सैन्य भरती कार्यालयाने केले आहे. संयुक्त प्रवेश परीक्षेसाठी उमेदवारांना पाच परीक्षा केंद्र निवडावी लागणार आहेत. ऑनलाईन संयुक्त प्रवेश परीक्षा 12 एप्रिल 2023 पासून घेतली जाईल. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात शारीरिक तंदुरुस्ती चाचणी, शारीरिक मोजमाप चाचणी आणि वैद्यकीय चाचणी घेण्यात येईल.

***

S.Thakur/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1897050) Visitor Counter : 172


Read this release in: English