अर्थ मंत्रालय
प्रधानमंत्री मुद्रा योजनेने 2015 ते 2018 या काळात 1.12 कोटी निव्वळ अतिरिक्त रोजगार निर्मिती केली
Posted On:
06 FEB 2023 9:40PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 6 फेब्रुवारी 2023
प्रधानमंत्री मुद्रा योजनेने केलेल्या रोजगार निर्मितीचे मूल्यांकन करण्यासाठी श्रम आणि रोजगार मंत्रालयाने (MoLE) मोठ्या प्रमाणावर केलेल्या राष्ट्रीय स्तरावरच्या नमुना सर्वेक्षणाच्या निष्कर्षावरून असे निदर्शनाला आले आहे की प्रधानमंत्री मुद्रा योजनेमुळे 2015 ते 2018 या तीन वर्षांच्या काळात 1.12 कोटी निव्वळ अतिरिक्त रोजगार निर्माण करण्यात मदत झाली. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत किसनराव कराड यांनी आज लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.
गेल्या तीन आर्थिक वर्षांमध्ये राजस्थान मध्ये वितरण केलेल्या एकूण 81 लाख कर्जांपैकी 52 लाखांपेक्षा अधिक कर्ज महिला उद्योजिकांना वितरीत करण्यात आली ही रक्कम महिलांना दिलेल्या कर्जाच्या 64% इतकी आहे, असे त्यांनी सांगितले.
प्रधान मंत्री मुद्रा योजनेच्या अंमलबजावणीशी संबंधित कोणत्याही बाबीचे, टर्न-अराउंड-टाइम (TAT)म्हणजे कार्यवाही पूर्ण होण्यासाठी लागणारा कालावधी, कर्जाचे अर्ज नाकारणे आणि काही प्रसंगी तारण/ हमीदाराचा आग्रह यासह संबंधित बँकांशी समन्वय साधून निराकरण केले जाते, असे मंत्री म्हणाले.
या योजनेचा आढावा वेळोवेळी घेतला जातो.
* * *
N.Chitale/B.Sontakke/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1896825)