वस्त्रोद्योग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

काळा घोडा कला महोत्सवात यावर्षी प्रथमच मुंबईच्या एनआयएफटी संस्थेचा सहभाग


महोत्सवात उभारलेली प्रदर्शने आणि कार्यक्रम यांच्या माध्यमातून ‘एक-सा’ या संकल्पनेचा अविष्कार

Posted On: 06 FEB 2023 5:35PM by PIB Mumbai

मुंबई, 6 फेब्रुवारी 2023

 

काळा घोडा कला महोत्सव हा मुंबईतील खुल्या जागेत दर वर्षी फेब्रुवारी महिन्यात भरवला जाणारा मोठा बहु-संस्कृतीय महोत्सव आहे. मुंबई येथील एनआयएफटी अर्थात राष्ट्रीय फॅशन तंत्रज्ञान संस्था यावर्षी प्रथमच या लोकप्रिय आणि प्रतिष्ठित महोत्सवात सहभागी होत आहे. समाजातील सर्व घटकांसाठी समानता, एकता आणि सन्मान यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने एनआयएफटी ‘एक-सा/ EK – sa (1 सा- रिस्पेक्टींग आयडेंटीफाईज) या संकल्पनेवर आधारित सादरीकरणे करणार आहे.

संकल्पना

अनादि काळापासून माणसाने समता विरोधी परिसंस्था निर्माण केली आहे. काही व्यक्तिमत्वांना दुर्लक्षित ठेवल्यामुळे वातावरणात मतभेद आणि विसंवाद निर्माण होऊन शेवटी काही अत्यंत सुंदर प्रजाती, संस्कृती आणि वारसा नामशेष झाला. समाजातील असमानतेची आपण फार मोठी किंमत मोजली असून त्यामुळे आपल्या परिसंस्थेच्या सामाजिक वस्त्राचे धागे सतत उसवत आहेत. ‘एक-सा/ ईके-एसए (1 सा- रिस्पेक्टींग आयडेंटीटीज) या एनआयएफटी च्या संकल्पनेवर आधारित इंस्टॉलेशन्स म्हणून सहा अष्टकोनी आकाराच्या संरचनांचा गट आहे आणि त्यात चंद्राच्या कला जमिनीवर आल्याचा भास होतो.

स्थिर प्रदर्शनांसह, एनआयएफटीच्या विद्यार्थ्यांनी या इंस्टॉलेशन्सच्या अवतीभवती 15 मिनिटे कालावधीचे एक सादरीकरण देखील आयोजित केले आहे.

महोत्सवाच्या पहिल्या दिवशी ही इंस्टॉलेशन्स तसेच सादरीकरण यांना रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. या सुंदर निर्मितीचा आनंद घेण्यासाठी एनआयएफटी सर्वांना मुंबईच्या महात्मा गांधी रस्त्यावरील क्रॉस मैदानावरील बगीच्यात भरलेल्या काळा घोडा कला महोत्सव 2023 ला भेट देण्याचे निमंत्रण देत आहे. दिनांक 4 ते 12 फेब्रुवारी या काळात सकाळी 10 वाजल्यापासून या महोत्सवाला भेट देता येईल.

महोत्सवातील एनआयएफटीच्या इंस्टॉलेशन्सची थोडक्यात माहिती खाली दिली आहे:-

वे अहेड

आयुष्य म्हणजे अनेक कडू-गोड चढ –उतारांचा प्रवास आहे, जीवन कंठत असताना, आपण जे मार्ग निवडतो त्यासाठी आपले हृदय दिशादर्शनाचे काम करते. ‘वे अहेड मधून’ जीवनाचा प्रत्येक प्रवास आनंद, शांती आणि कल्याणाच्या  दिशेने होईल अशी आशा आम्ही बाळगतो.  या इंस्टॉलेशन मध्ये, सोलापूरच्या विणकरांनी निर्माण केलेल्या कलाकुसरीचा वापर करून एका प्रवाशाचा प्रवास सादर केला आहे.

 

रिफ्लेक्ट

भारतातील हस्तकला म्हणजे आपल्या समृद्ध वारशातून झालेली उत्पत्ती आहे. आपण आपल्या कारागीरांच्या समृद्धतेसाठी वातावरणनिर्मिती करण्यासाठी काय करून शकतो हे ‘रिफ्लेक्ट’ मध्ये दाखवण्यात आले आहे. या इंस्टॉलेशनमध्ये आपल्या पूर्वापार चालत आलेल्या आणि नामशेष होतील अशी भीती असलेल्या कलांचा वापर करून अत्यंत देखण्या समकालीन पोशाखांची निर्मिती करण्यात आली आहे. पैठण परिसरात तयार होणाऱ्या आणि मोर,पोपट तसेच कमळांची नक्षी असणाऱ्या पैठणी साड्यांपासून उभारलेले हे इंस्टॉलेशन महाराष्ट्राच्या वारशाची ओळख करून देते.

 

वेटिंग फॉर गोदो

आपण आपल्या आयुष्यातील मोठा काळ अशा गोष्टींची वाट पाहण्यात घालवतो ज्या आपल्याला क्वचितच मिळणार असतात. आपण मनातून वाट बघत राहतो आणि त्या काळाचा अर्थच गमावून बसतो, चिंतेने आपली दिशा हरवते. “वेटिंग फॉर गोदो’ आपल्यासमोर प्रश्न उभा करते की, ही प्रतीक्षा संपणार आहे का? की आपल्याला जबाबदारी घेण्याची आणि प्रतीक्षा थांबवण्याची गरज आहे? सोलापूर येथील कारागिरांनी तयार केलेली बांबूची हँगिंग, सावंतवाडीच्या कलाकारांनी बांबू आणि लाकडापासून बनवलेल्या वस्तू आणि कोल्हापूर येथील समूहांनी तयार केलेल्या चामड्याच्या कलाकुसरीच्या वस्तू यांच्यापासून निर्माण केलेली कलाकृती या इंस्टॉलेशनमध्ये बघायला मिळते.

 

हॅन्ड्स विथ अ हार्ट

दोन हातांनी पातळ धाग्यांपासून कापड तयार करण्यासाठी काय आवश्यक आहे याची आपल्याला फार कमी माहिती आहे.या कापडाचे सौन्दर्य वाढवण्यासाठी ,ते  इतके सुंदर विणण्यासाठी, कारागिरांची बोटे मनापासून काम करतात. या कलाकृतीच्या स्थापनेमध्ये  सोलापूरच्या विणकर आणि वारली कलाकारांनी बनवलेल्या आधुनिक कलाकृतींचा उत्कृष्ट वापर करण्यात आला आहे.

 

ब्रेकिंग ऑल सिलिंग्स

अस्तित्वात असलेल्या मर्यादा केवळ आपल्या मनात आहेत. आरामदायी  आणि अनुकूल कवचातून बाहेर आल्यास ;ही स्थिती एखाद्याला अधिक शक्यतांसाठी तयार करते  आणि अस्तित्वासाठी   डोक्यावरचे ओझे हलके  करते. ‘ब्रेकिंग ऑल सीलिंग्ज’  ही कलाकृती  आत्मपरीक्षण करण्याबद्दल आणि स्वत: वर लागू केलेल्या मर्यादा आणि व्यवहारांपासून  मुक्त होण्याबद्दल बोलते.

 

रॅप्ड  इन अ  फॅब्रिक कॉल्ड ह्युमॅनिटी

आपण सर्वजण वेगळे दिसू शकतो, वेगळा विचार करू शकतो आणि वेगळ्या पद्धतीने वागू शकतो, परंतु तरीही आपण मानवता नावाच्या एकाच वस्त्रामध्ये  गुंडाळलेले आहोत नाही का?

 

या कलाकृतींच्या स्थापनेसह केलेल्या दमदार कलाविष्कारांनी  एनआयएफटीची संकल्पना आधिक विस्तारली. यावर एक दृष्टिक्षेप

सबरंग

रंग, वर्ग आणि जातीचे प्रतिनिधित्व करणारा  श्रेष्ठतेचा बाह्य देखावा ,असामाजिक मानकांचे परिणाम आहेत. रंगांना आपली मालकी बनवणे पूर्णपणे अस्वीकार्य आहे. हे सबरंग या पथनाट्याच्या माध्यमातून   सादर करण्यात आले.

 

अन-शॅकल

माणसांना  सुस्त राहणे  आरामदायी  वाटते  आणि एखादी गोष्ट त्यांना स्वतःकडे  खेचत असेल तर याला पूर्ण शक्तीनिशी सामोरे गेल्याशिवाय ती गोष्ट लक्षात येत नाही . जोपर्यंत आपण स्वतःला प्रत्येक वेळी अनुकूल असलेल्या परिस्थितीपासून आणि मर्यादांपासून मुक्त करण्यासाठी जागरूकता आणि धैर्य प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करत नाही तोपर्यंत आपण  स्वतःला पिंजऱ्यात बंद केलेले आहे. या तारा ज्या कठपुतळ्यांच्या हातात आहेत त्यांच्यापासून स्वतःला दूर  करण्यासाठी आणि  स्वतःच्या जीवनाच्या तालावर फेर धरण्यासाठी  मोकळे करण्याच्या दृष्टीने अद्यापही उशीर झालेला नाही.

 

अन-कॉन्फ्लिक्ट

अनादरातून मतभेद आणि संघर्ष निर्माण होतो. सत्ता आणि लालसेच्या खेळात भोळी  आणि सामान्य जनता प्यादे बनते हे संघर्षाचे वास्तव आहे. 

 

अन -ऑप्रेस

अत्याचार सहन करणारी व्यक्ती अत्याचाऱ्याइतकीच दोषी आहे.  एका सामर्थ्यशाली गटाने  दुर्बल घटकांवर केलेल्या क्रौर्याचा इतिहास साक्षीदार आहे. मुक्ततेसाठी  आणि समानतेसाठी ,जुलूम करणाऱ्याचे सामर्थ्य  मोडून काढणे सर्व प्राणीमात्रांना  आवश्यक आहे

 

अन - डार्क

प्रत्येक मौल्यवान वस्तूचे काटेकोर  संरक्षण करणे आवश्यक आहे.ही केवळ भौतिक संपत्ती नाही,सत्य देखील आहे  - ज्याला संरक्षण आवश्यक आहे ती  सर्वात महत्वाची गोष्ट आहे. सत्याकडे दृष्टीकोन असू शकतो, परंतु वैश्विक सत्य हे आकलन आणि दृष्टीकोनांच्या पलीकडे आहे. आणि ज्यांना सत्य अप्रकाशित करायचे  आहे त्यांच्यापासून त्याचे संरक्षण करण्यासाठी आपण स्वतःला वचनबद्ध केले पाहिजे.आज अन-डार्क हा प्रयोग सादर केला जाईल.

या कलाकृतींच्या स्थापनेद्वारे  आणि सादरीकरणाच्या माध्यमातून  ‘एक-सा/EK-sa ही संकल्पना  चित्रित करण्याचे उद्दिष्ट आहे. हे जग असंख्य रंग, कल्पना, दृष्टीकोन आणि श्रद्धा यांचा अंतर्भाव असलेले  एक अद्भुत ठिकाण आहे. जेव्हा जेव्हा समाजाने कोणत्याही पैलूकडे दुर्लक्ष केले किंवा कानाडोळा केला , तेव्हा विसंगती निर्माण झाली. समाजरुपी वस्त्र निकोप आणि चैतन्यशील ठेवण्यासाठी, सहमत नसलो तरी आदर राखणे अत्यंत महत्त्वाचे  आहे.

राष्ट्रीय फॅशन तंत्रज्ञान संस्था (एनआयएफटी) बद्दल

भारत सरकारच्या वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत 1986 मध्ये स्थापन केलेली ((एनआयएफटी) ही (एनआयएफटी कायदा 2006 द्वारे प्रशासित  असलेली एक वैधानिक संस्था आहे.ज्ञान, पारंपारिक कला, समकालीन विचार आणि शैक्षणिक स्वातंत्र्य, डिझाईन आणि तंत्रज्ञानातील नवकल्पना आणि सर्जनशील विचार यांचे एकत्रीकरण   करण्याची क्षमता असलेले एनआयएफटी  फॅशन शिक्षणामध्ये  एक अग्रणी संस्था आहे.एनआयएफटीने   आज आपला विस्तार   देशभर केला आहे. आपल्या 18 व्यावसायिकरित्या व्यवस्थापित आवाराच्या माध्यमातून , एनआयएफटी देशाच्या विविध भागांतील आपल्या विद्यार्थ्यांना देऊ केलेल्या कार्यक्रमांद्वारे त्यांना सर्वोच्च क्षमता प्राप्त करण्यासाठी एक उत्कृष्ट वातावरण प्रदान करते.एनआयएफटी मुंबईची स्थापना 1995 मध्ये "फॅशन कॅपिटल ऑफ इंडिया" मध्ये करण्यात आली, आज एनआयएफटी  मुंबई हे शैक्षणिक केंद्र खारघर नवी मुंबईमध्ये 10 एकर परिसरात पसरले आहे.

 

* * *

PIB Mumbai | N.Chitale/Sanjana/Sonal/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1896700) Visitor Counter : 275


Read this release in: English