विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

सीएसआयआर- राष्ट्रीय सागरशास्त्र संस्थेतर्फे 6 ते 11 फेब्रुवारीदरम्यान “एक सप्ताह, एक प्रयोगशाळा” अभियानाचे आयोजन

Posted On: 04 FEB 2023 10:26PM by PIB Mumbai

 

सीएसआयआर- राष्ट्रीय सागरशास्त्र संस्थेतर्फे एक सप्ताह, एक प्रयोगशाळा उपक्रम साजरा करण्यासाठी 6 ते 11 फेब्रुवारी या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आठवडाभर चालणाऱ्या या कार्यक्रमाचे उद्घाटन गोवा येथील आयआयटीचे संचालक प्रा.बी.के.मिश्रा यांच्या उपस्थितीत 6 फेब्रुवारी रोजी होणार आहे. या सप्ताहादरम्यान 9 फेब्रुवारी रोजी नियोजित समाज आणि भागधारक संवाद सत्राचे प्रमुख अतिथी म्हणून गोव्याचे मत्स्यव्यवसाय, पशुपालन आणि पशुवैद्यकीय सेवा, कारखाने आणि बॉयलर्स मंत्री नीलकंठ हलर्नकेर उपस्थित राहणार आहेत.

देशभरातील सीएसआयआर अर्थात शास्त्रीय तसेच औद्योगिक संशोधन मंडळाच्या प्रयोगशाळांतील तंत्रज्ञान आणि अभिनव संशोधन यांची माहिती देण्यासाठी केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ.जितेंद्र सिंह यांनी एक सप्ताह, एक प्रयोगशाळा अभियानाची घोषणा केली आहे. या अभियानाचा भाग म्हणून देशभरात विस्तारलेल्या 37 महत्त्वाच्या सीएसआयआर संस्थांमधील प्रत्येक संस्था एकापाठोपाठ एक अशा पद्धतीने दर आठवड्याला भारतातील जनतेला आपापल्या संस्थेतील वैशिष्ट्यपूर्ण अभिनव संशोधनांचे दर्शन घडवणार आहे.

6 ते 11 फेब्रुवारी या काळात नियोजित कार्यक्रमांचा तपशील खाली दिला आहे

Date

Theme

Event

Target Group (s)

06 Feb 2023

0930-1330 h

Student-Teacher-Scientist Connect

Exhibitions, Lab visits, Hands-on with Techniques/technology

Talk on Ocean Sciences and career opportunities, Documentaries on Ocean Science

School children

8th to 12th and science teachers & general public

07 Feb 2023

0930-1700 h

Hands-on with Techniques/technology

demonstrations of sampling tools, simulation of ocean processes, particle tracking, hydrography, remote Sensing, Robotics and Quiz competition

School children

8th to 12th

50-60 students

Parallel sessions

08 Feb 2023

0930-1330 h

Entrepreneurship prospects in marine science & technologies


 

Interaction with start-ups, undergraduates and post graduates

start-ups, undergraduates and post graduates

08 Feb 2023

1430-1700 h

Research opportunities in Oceanography

PhD., dissertation, internship programs in Oceanography

Undergraduates and post-graduates (Science & Engineering)

09 Feb 2023

0930-1700 h

Society & Stakeholder Connect

Skill development -Seaweed & Mussel Cultivation

Field visit to Seaweed farming site

Coastal communities, Aquafarmers,

Sagar Mitras

10 Feb 2023

0930-1700 h

Industry Connect

Meet with industry representatives

Select industries interested in CSIR-NIO technologies

11 Feb 2023

0930-1800 h

Society Connect

Awareness program on fishery waste to wealth at Panaji & Surrounding villages

Local community

***

S.Patil/S.Chitnis/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1896399) Visitor Counter : 164


Read this release in: English