जलशक्ती मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

स्वच्छ भारत अभियान  (ग्रामीण) अंतर्गत महाराष्ट्रात 68.90 लाख वैयक्तिक घरगुती शौचालये बांधण्यात आली: राज्यमंत्री (जल शक्ती)


एकट्या ठाणे जिल्ह्यात स्वच्छ भारत अभियान (ग्रामीण) अंतर्गत 90 हजारांहून अधिक घरगुती शौचालये बांधण्यात आली

Posted On: 03 FEB 2023 8:42PM by PIB Mumbai

 

स्वच्छ भारत अभियान (एसबीएम) - ग्रामीणच्या एकात्मिक व्यवस्थापन माहिती प्रणालीवर (आयएमआयएस) महाराष्ट्राने नोंदवलेल्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात एसबीएम (ग्रामीण) अंतर्गत 2014-15 ते 2022-23 (30.01.2023 पर्यंत) या कालावधीत 68.90 लाख वैयक्तिक घरगुती शौचालये (आयएचएचएल) बांधण्यात आली आहेत, त्यापैकी ठाणे जिल्ह्यात 90,436 वैयक्तिक घरगुती शौचालये बांधण्यात आली आहेत.

30 जानेवारी 2023 पर्यंत प्राप्त आकडेवारीनुसार,  2020-21 पासून स्वच्छ भारत अभियान - ग्रामीणच्या  टप्पा-II अंतर्गत राज्यात 6,605 सामुदायिक स्वच्छता संकुल (सीएससी ) बांधण्यात आले आहेत. त्यापैकी ठाणे जिल्ह्यात 58 सीएससी बांधण्यात आल्याची नोंद महाराष्ट्र राज्याने आयएमआयएसवर केली आहे.

स्वच्छ भारत अभियान -ग्रामीण  अंतर्गत, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना निधी जारी केला जातो. या निधीचे  पुढील वितरण राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांद्वारे जिल्ह्यांमध्ये  केले जाते. 2014-15 ते 2022-23 या कालावधीत भारत सरकारने एसबीएम (ग्रामीण ) अंतर्गत महाराष्ट्राला दिलेला केंद्राच्या  हिश्श्याचा  निधी आणि राज्याने दिलेल्या  निधीचे तपशील खालीलप्रमाणे आहेत:

 

Year

Funds allocated

Funds drawn by the State

2014-15

236.11

236.11

2015-16

1014.30

567.45

2016-17

528.94

528.94

2017-18

1235.34

1235.34

2018-19

2709.52

1352.92

2019-20

679.67

396.97

2020-21

340.62

276.75

2021-22

1372.73

0.00

2022-23          (upto 30.01.2023)

1740.11

0.00

           Total

4594.48

 

 

एसबीएम (ग्रामीण) अंतर्गत तसेच  महाराष्ट्र आणि ठाणे जिल्ह्यातील इतर योजनांचे एकत्रीकरण करून बांधण्यात आलेले जैवविघटनशील कचरा व्यवस्थापन आणि सांडपाणी  व्यवस्थापनाच्या सुविधांचा तपशील राज्याने एसबीएम(ग्रामीण) आयएमआयएस वर नोंदवल्यानुसार खालीलप्रमाणे आहेत:

 

Biodegradable waste management facilities

Maharashtra

Thane district

No. of community compost pits

10,922

265

No. of community bio-gas plants

861

1

No. of vehicles for collection & transportation of waste

4,762

91

No. of segregation bins at public places

6,213

11

No. of waste collection and segregation sheds

3,084

2

 

 

Grey water management facilities

Maharashtra

Thane district

No. of community soak pits/leach pits/magic pits

14,214

71

No. of community grey water management systems (Waste Stabilization Ponds, Constructed Wetlands, etc.)

1,767

11

No. of drainage facility

23,913

110

No. of household compost pits

53,046

112

No. of individual bio-gas plants

6,920

13

No. of individual soak pits/leach pits/magic pits/kitchen gardens

6,48,675

3,522

 

केंद्रीय जलशक्ती राज्यमंत्री  प्रल्हाद सिंह पटेल यांनी गुरुवारी (2 फेब्रुवारी 2023) लोकसभेत  राजन विचारे यांनी विचारलेल्या बिगर-तारांकित प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.

***

S.Patil/S.Chavan/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1896177) Visitor Counter : 241


Read this release in: English