आयुष मंत्रालय

राष्ट्रीय निसर्गोपचार संस्थेत महात्मा गांधी पुण्यतिथीनिमित्ताने अभिवादन

Posted On: 30 JAN 2023 7:00PM by PIB Mumbai

पुणे, 30 जानेवारी 2023

 

पुण्यातील राष्ट्रीय निसर्गोपचार संस्था येथे आज, हुतात्मा दिवसा निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्र सरकारच्या विक्री आणि कर आयुक्त कार्यालय, मुंबईचे विशेष आयुक्त नितीन पाटील, भारत सरकारच्या केंद्रीय संचार ब्युरोचे उपसंचालक निखिल देशमुख, राष्ट्रीय निसर्गोपचार संस्थेच्या संचालक प्रा.(डॉ.) के. सत्या लक्ष्मी यांच्या सह इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते. महात्मा गांधी संग्रहालयातील गांधीजींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.

यावेळी केंद्रीय संचार ब्युरोच्या संघाने ‘भावांजली’ हा संगीतमय श्रद्धांजलीपर कार्यक्रम सादर केला. राष्ट्रीय निसर्गोपचार संस्थेच्या संचालक प्रा.(डॉ.) के. सत्या लक्ष्मी यांनी मान्यवरांचे स्वागत केले. आपला देश आणि देशाच्या प्रत्येक नागरिकाला स्वावलंबी बनवण्याच्या महात्मा गांधींच्या दूरदृष्टीचे डॉ  सत्या लक्ष्मी यांनी विश्लेषण केले.

या कार्यक्रमात, ए.एन. त्रिपाठी लिखित ‘ग्राम सुरज का मार्ग’ या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. लेखकाने यावेळी बोलताना गांधीवादी विचार आणि जीवनशैलीकडे असलेला आपला कल विषद केला. यातूनच लेखकाला आपले विचार पुस्तक रूपात लिहिण्याची प्रेरणा मिळाली असल्याचे त्यांनी सांगितले.

नितीन पाटील यांनी आपला आदिवासी समुदायाबरोबर काम करण्याच्या अनुभवाचे कथन केले. गांधीवादी विचार आणि तत्त्वांनी त्यांना आदिवासी समुदायाबरोबर काम करण्यास कसे प्रवृत्त केले तसेच निसर्गोपचारांचे पालन करणे ही त्यांची आवड कशी बनली याबद्दल सांगितले.

निखिल देशमुख यांनी दैनंदिन जीवनात गांधीवादी मूल्ये आणि तत्त्वे आत्मसात करून गांधीवादी जीवनपद्धतीच्या अवलंबाद्वारे भारताचे जबाबदार नागरिक होण्यासाठी उपस्थितांना प्रोत्साहित केले. शाश्वत जीवनाच्या कल्पनांना चालना देण्यासाठी राष्ट्रीय निसर्गोपचार संस्थेने, एनर्जी गुरूच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सह-संस्थापक तसेच सौरऊर्जा तंत्रज्ञानामधील तज्ञ गीतांजली पाटील, आणि मातीची भांडी आणि सिरॅमिकमध्ये प्रसिद्ध असलेले निनाद यांना त्यांचे विचार मांडण्यासाठी करण्यासाठी आणि प्रत्येकाला शाश्वत जीवन पद्धती वापरण्यासाठी प्रवृत्त करण्यासाठी आमंत्रित केले. गीतांजली पाटील, आणि निनाद यांनी त्यांच्या उत्पादनांचे प्रदर्शन केले आणि त्याला लोकांनी चांगला प्रतिसाद दिला.

राष्ट्रीय निसर्गोपचार संस्थेच्या उपचार सहाय्यक प्रशिक्षण अभ्यासक्रमाचे विद्यार्थी आणि गोहे, आंबेगाव येथील आदिवासी केंद्र यांच्यासाठी आयोजित क्रीडा दिनाच्या बक्षीस वितरणाने कार्यक्रमाची सांगता झाली. राष्ट्रीय निसर्गोपचार संस्थेचे लेखापाल मंदार देशपांडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Shri A.N Tripathi (IFS) paying floral tribute to Mahatma Gandhi

 

‘Bhavanjali’ a musical tribute was performed by the team of Central Bureau of Communication

 

 

Book ‘Gram Suraaj ka path’ was released by the dignitaries

 

* * *

PIB Pune | M.Iyengar/S.Mukhedkar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1894771) Visitor Counter : 121


Read this release in: English