महिला आणि बालविकास मंत्रालय
समाजामधील मुलींचे महत्व अधोरेखित करण्यासाठी महिला आणि बालविकास मंत्रालयाने साजरा केला राष्ट्रीय बालिका दिवस
Posted On:
24 JAN 2023 5:17PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 जानेवारी 2023
महिला आणि बाल विकास मंत्रालयाने यंदाचा राष्ट्रीय बालिका दिवस जनभागीदारी मधून साजरा करण्याचे ठरवले आहे. राज्ये/केंद्रशासित प्रदेश आणि जिल्ह्यांनी 18 ते 24 जानेवारी 2023 या कालावधीत मुलींच्या सन्मानाचा भाग म्हणून विविध उपक्रम आयोजित करावेत, अशी विनंती करण्यात आली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर या मोहिमेचा प्रचार करण्यासाठी हॅश टॅग आहे, हॅशटॅग(#akamceIebratinggirlchildmwcd).
मुलींचे महत्व आणि बालकांचे हक्क याबाबत सकारात्मक संदेश प्रसारित करण्यासाठी जिल्ह्यांद्वारे आयोजित करण्यात आलेले 5 दिवसांचे कार्यक्रम/उपक्रम, हे राष्ट्रीय बालिका दिनाच्या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य आहे. राष्ट्रीय बालिका दिनानिमित्त शिक्षण, क्रीडा, सामाजिक कल्याण आणि समुदाय एकत्रीकरण या क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांचा सत्कार केला जाईल.
लिंग-आधारित गर्भ निवड रोखणे, बालिकांचे जगणे आणि संरक्षण सुनिश्चित करणे आणि मुलींचे शिक्षण सुलभ करणे, या उद्देशाने 2015 मध्ये भारत सरकारचा बेटी बचाओ बेटी पढाओ हा प्रमुख उपक्रम सुरू करण्यात आला. या योजनेने विविध मापदंडांच्या आधारावर प्रगती केली आहे आणि देशाची सदसद्विवेकबुद्धी जागी केली आहे.
समाजामधील मुलींचे महत्व अधोरेखित करण्यासाठी, महिला आणि बाल विकास मंत्रालय दर वर्षी 24 जानेवारी रोजी राष्ट्रीय बालिका दिन साजरा करते.
S.Kane/R.Agashe/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1893311)
Visitor Counter : 269