माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

जेजुरी गडावर आयोजित भारतीय स्वातंत्र्य लढ्याची दूर्मिळ माहिती देणाऱ्या आजादी का अमृत महोत्सव बहू माध्यम प्रदर्शनास भाविकांनी भेटी द्याव्यात – श्रीमती स्मिता वत्स शर्मा, अतिरिक्त महासंचालक, पत्र सूचना कार्यालय व केंद्रीय संचार ब्यूरो, मुंबई


जेजुरी गडावर आज पासून भव्य आजादी का अमृत महोत्सव व आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षे-2023 बहू माध्यम प्रद्रशास सुरुवात

Posted On: 24 JAN 2023 4:38PM by PIB Mumbai

पुणे,  24 जानेवारी  2023

 बहू माध्यमातून प्रदर्शित दूर्मिळ छायाचित्रे, लघूपट तसेच अत्यंत कमी वेळात भारतीय स्वातंत्र्य लढ्याची माहिती श्री मार्तंड देव संस्थान जेजूरी येथे येण्यारा भाविंकाना व्हावी यासीठी आयोजित करण्यात आलेल्या आजादी का अमृत महोत्सव व आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षे- 2023 या बहूमाध्यम प्रदर्शनाला भेटी द्याव्यात,असे आवाहन माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे, पत्र सूचना कार्यालय मुंबई व केंद्रीय संचार ब्यूरो, पुणे (महाराष्ट्र व गोवा राज्य ) च्या अतिरिक्त महासंचालक श्रीमती स्मिता वत्स शर्मा यांनी  उद्घाटन प्रसंगी  केले.

या प्रसंगी प्रमाद गायकवाड, उपविभागीय अधिकारी, उपविभागीय कार्यालय, पुरंदर, निखिल देशमुख, उपसंचालक,केंद्रीय संचार ब्यूरो, पुणे, राजेद्र जगताप, मुख्याधिकारी, श्री मार्तंड देवस्थान जेजुरी, चारुदत्त इंगोले, मुख्याधिकारी जेजुरी नगर परिषद, धनराज गिराम, बालविकास अधिकारी, पंचायत समिती पुरंदर, डॉ. सारंग डांगे, वैद्यकिय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, बेलसर. श्री मार्तंड देवस्थान जेजुरीचे माजी विश्वस्त सर्वश्री तुशार सहाणे, पंकज निकूडे पाटील, सॉलिसिटर प्रसाद शिंदे, अशोकराव संकपाळ, व्यवस्थापक सतीश घाडगे, क्षेत्रीय प्रचार अधिकारी माधव जायभाये, सहायक प्रचार अधिकारी पी.कुमार आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

या प्रदर्शनाचे आयोजन माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे  केंद्रीय संचार ब्यूरो, प्रादेशिक कार्यालय पुणे व श्री मार्तं देव संस्थान जेजुरी, ता. पुरंदर, जि. पुणे यांच्या  वतीने करण्यात आले  असून  या प्रदर्शनात भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासातील विविध महत्त्वाच्या घटना-घडामोडी, बहूमाध्यमातून प्रदर्शित करण्यात आल्या  आहेत. यात 1857 ते 1947 या कालखंडातील भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील महत्वाच्या घडामोडी आणि महान स्वातंत्र्यसेनानी यांची जीवनगाथा अत्यंत संक्षिप्त माहिती आणि बहूमाध्यमातून अधूनिक तंत्रज्ञानाच्या सहायाने  दर्शविण्यात आली आहे.

संयूक्त राष्ट्र संघाने 2023 हे वर्षे आंतराष्ट्रीय तृणधान्य वर्षे म्हणून साजरे करण्याच्या निर्णय घेतला आहे,  भारत हा जगातील सर्वात जास्त तृणधान्य पिकविणारा देश आहे, ज्वारी,बाजरी,नाचणी, वरई,राळा, राजगिरा या धान्यातून आरोग्यास लोह, कॅल्शियम, झिंक, आयोडिन आदी घटक मिळतात, सा सर्व धान्यांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी या प्रदर्शनस्थळी तृणधान्य प्रदर्शनही भरविण्यात आले आहे.

गडावर येणाऱ्या  भाविकांना कमीत कमी वेळात आणि मनोरंजनाच्या माध्यमातून या प्रदर्शनाची माहिती देण्यासाठी या प्रदर्शनात  विविध स्वातंत्र्य सेनानींचे कटआऊट्स, बॅकलीट पॅनल्स्, एलइजी वॉल, प्रदर्शनी पॅनल्स, लघू चित्रपट आदी माध्यमांचा वापर करण्यात आला आहे.

प्रदर्शनाच्या ठिकाणी तहसिल कार्यालय, पंचायत समिती, पुरंदर, जेजुरी नगर परिषद यांच्या द्वारे विविध योजनांची माहिती देणारे स्टाल्स् मांडण्यात आले आहेत, यात महिला बाल कल्याण विभागाच्या वतीने तृणधान्यची माहिती देण्यासाठी या धान्यंपासून तयार करण्यात आलेल्या सकस आहाराचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. आरोग्य विभागाद्वारे भाविकांची प्राथमिक तपासणी करुन त्यांना तात्पूरता उपचार देण्यासाठी स्टाल उभारण्यात आला आहे. नगर परिषद जेजुरीच्या वतिने आयुषमाण भारत आणि प्रधानमंत्री स्वनिधी योजनांचे लाभधारकांना कार्ड वाटप करण्यात आले  या प्रदर्शन स्थळी जय मल्हार कलापथकाद्वारे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

हे प्रदर्शन दिनांक 24 ते 28 जानेवारी 2023 पर्यत सर्व भाविकांसाठी खूल ठेवण्यात आले असून सर्व नागरिकांनी या प्रदर्शनास भेटी द्याव्यात असे आवाहन भारत सरकाच्या वतीने करण्यात  आले आहे.

M.Iyengar/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1893291) Visitor Counter : 220


Read this release in: English