शिक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav g20-india-2023

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिहिलेल्या ‘एक्झाम वॉरियर्स’ पुस्तकाचे राज्यपाल पी एस श्रीधरन पिल्लई आणि केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते प्रकाशन

Posted On: 19 JAN 2023 6:32PM by PIB Mumbai

पणजी,  19 जानेवारी 2023

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिहिलेल्या ‘एक्झाम वॉरियर्स’ पुस्तकाचे आज राजभवन येथे राज्यपाल पी एस श्रीधरन पिल्लई आणि केंद्रीय पर्यटन आणि बंदरे, नौवहन आणि जलमार्ग राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते करण्यात आले.

 

यावेळी विद्यार्थी आणि शिक्षकांना संबोधित करताना राज्यपाल म्हणाले की, हे पुस्तक विद्यार्थ्यांना आत्मविश्वास देईल. अतिशय उपयुक्त सोप्या भाषेत समजावून सांगितल्या आहे, ज्यामुळे विद्यार्थ्यांना जीवनात प्रगती करण्यास मदत होईल.

 

‘एक्झाम वॉरियर्स’ हे पालक आणि शिक्षकांसाठी उपयुक्त आहे. व्यावहारिकदृष्ट्या आपले पंतप्रधान आव्हाने आणि विविध समस्यांवर मात करण्यासाठी आपले नेतृत्व करत आहेत. देशाचे भविष्य हे आपले विद्यार्थी आहेत, त्यामुळे त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी हे पुस्तक विशेष आहे, असे राज्यपाल म्हणाले.

 प्राचीन काळी जगभरातून लोक भारतात शिक्षणासाठी येत होते, आता आपला देश शैक्षणिक क्षेत्रात प्रगती करत असल्याने तीच ओळख परत मिळत असल्याचे राज्यपाल म्हणाले.

 

केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक याप्रसंगी बोलताना म्हणाले की,  हे पुस्तक विद्यार्थ्यांना परीक्षा आणि करियरबाबतच्या संदिग्धतेवर मात करण्यास मदत करेल. पंतप्रधान स्वतः एक मेहनती व्यक्ती आहेत, जे प्रत्येक गोष्टीत राष्ट्राला प्रथम स्थान देतात. पुढच्या पिढीची सर्वांगीण प्रगती आणि विकास हा देखील पंतप्रधानांचा चिंतनाचा मुख्य केंद्रबिंदू आहे. हे पुस्तक विद्यार्थ्यांना केवळ शैक्षणिकच नव्हे तर जीवनभरासाठी मार्गदर्शक ठरेल.

यावेळी निवडक विद्यार्थ्यांना पुस्तकाच्या प्रती देण्यात आल्या. 27 जानेवारी 2023 रोजी पंतप्रधानांच्या 'परीक्षा पे चर्चा' या कार्यक्रमाच्या अनुषंगाने पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

 

परीक्षा पे चर्चा

'परीक्षा पे चर्चा'  हा एक उपक्रम आहे, जो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि समाज यांना एकत्र आणण्याच्या प्रयत्नातून चालवला आहे. प्रत्येक विद्यार्थ्याचे स्वतंत्र व्यक्तिमत्व असते, ते बहरण्याच्या दृष्टीने पंतप्रधानांनी हा पुढाकार घेतला आहे. पंतप्रधानांनी लिहिलेल्या ‘एक्झाम वॉरियर्स’ या पुस्तक या उपक्रमाची प्रेरणा ठरत आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून पंतप्रधानांनी शिक्षणाबाबत एक नवीन दृष्टिकोन मांडला आहे. विद्यार्थ्यांच्या ज्ञान आणि सर्वांगीण विकासाला यात प्राथमिक महत्त्व दिले जाते. अवाजवी ताणतणाव आणि दबावामुळे परीक्षेला जीवन-मरणाची स्थिती बनवण्यापेक्षा सर्वांनी योग्य दृष्टीकोनातून परीक्षा देण्याचे आवाहन पंतप्रधान या उपक्रमाच्या माध्यमातून करतात.

G. S. Kumar/S.Thakur/PM

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBPanaji   Image result for facebook icon /PIBPanaji    /pib_goa   pibgoa[at]gmail[dot]com  /PIBGoa



(Release ID: 1892276) Visitor Counter : 160


Read this release in: English