दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ घेण्याचे गोवा टपाल विभागाचे आवाहन
अमृतपेक्स प्लसचा फेब्रुवारीमध्ये दिल्ली येथे भव्य सोहळा
Posted On:
18 JAN 2023 2:20PM by PIB Mumbai
पणजी, 18 जानेवारी 2023
‘अमृतपेक्स प्लस’ कार्यक्रम राष्ट्रीय स्तरावर दिल्ली येथे 11 फेब्रुवारी 2023 रोजी आयोजित करण्यात आला आहे. स्वातंत्र्याचा ‘अमृत महोत्सव’ आणि ‘अमृतपेक्स 2023 साठी महिला सक्षमीकरण आणि आर्थिक समावेशन मोहिमेचा एक भाग म्हणून सुकन्या समृद्धी योजनेंतर्गत बचत खाती उघडण्यासाठीचा व्यापक कार्यक्रम आहे. 24 तासांत राष्ट्रीय पातळीवर 7.5 लाख सुकन्या समृद्धी खाती उघडण्याचे नियोजन आहे. या राष्ट्रीय पातळीवरील उद्दिष्टात योगदान देण्यासाठी, गोवा टपाल विभागाने 10 वर्षाखालील मुलींच्या पालकांना मुलींचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी जवळच्या पोस्ट ऑफिसशी संपर्क साधण्याचे आणि सुकन्या समृद्धी खाते उघडण्याचे आवाहन केले आहे. योजनेच्या तपशीलासाठी नागरिकांनी 9 फेब्रुवारी 2023 रोजी नजीकच्या टपाल कार्यालयात संपर्क साधावा असे आवाहन आवाहन टपाल खात्याकडून करण्यात आले आहे.
G. S. Kumar/S.Thakur/PM
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBPanaji
/PIBPanaji
/pib_goa
pibgoa[at]gmail[dot]com
/PIBGoa
(Release ID: 1891943)
Visitor Counter : 189