उपराष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

लोहरी, मकर संक्रांती, बिहू, पोंगल आणि इतर सणांच्या पूर्वसंध्येला उपराष्ट्रपतींनी देशवासीयांना दिल्या शुभेच्छा

Posted On: 12 JAN 2023 9:35PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 12 जानेवारी 2023

 

लोहरी, मकर संक्रांती, माघा बिहू, पोंगल, उत्तरायण, पौष पर्व  आणि इतर सणांच्या पूर्वसंध्येला उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांचा संपूर्ण संदेश असा-

मी लोहरी, मकर संक्रांती, माघ बिहू, पोंगल, उत्तरायण आणि पौष पर्वच्या शुभ मुहूर्तावर सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. उत्तरायणात सूर्य उत्तरेकडे प्रवास करत असताना, संपूर्ण देशात कापणीचा हंगाम आपण हर्षोल्हासाने आणि निसर्गाच्या कृपेबद्दल कृतज्ञता व्यक्त करत साजरा करतो.

भारताच्या विविध भागांमध्ये वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाणारे हे सण आपल्या समृद्ध सांस्कृतिक विविधतेच्या अत्यावश्यक एकतेचे प्रतीक आहेत.

हा सणासुदीचा काळ सर्व नागरिकांसाठी समृद्धी, शांती आणि आनंद घेऊन येवो तसेच आपल्याला जोडणारे सद्भाव आणि बंधुत्वाचे बंध अधिक दृढ होवोत अशी माझी इच्छा आहे.

 

 

 

 

S.Kane/P.Jambhekar/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1890853)
Read this release in: English , Urdu