नौवहन मंत्रालय

जेएनपीए'ने वर्ष 2022 मध्ये 5.94 दशलक्ष टीईयू ची विक्रमी माल हाताळणी केली


वर्ष 2022 मधील टीईयू आणि टनेजमधील कार्गो हाताळणी आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर

Posted On: 03 JAN 2023 8:20PM by PIB Mumbai

मुंबई, 3 जानेवारी 2023

 

जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणाने (जेएनपीए) माल हाताळणीत सातत्त्याने वाढ नोंदवत,  वर्ष 2022 मध्ये 5,959,112 टीईयू इतकी मालवाहतूक केली आहे. वर्ष 2021 मध्ये ती 5,631,949 टीईयू इतकी होती. गेल्या वर्षाच्या तुलनेत ही वाढ 5.81% इतकी आहे. जेएनपीटी ने 2022 या वर्षात 81.1 दशलक्ष मेट्रिक टन (एमएमटी) मालाची हाताळणी केली. 2021 मध्ये ती 76.1 मेट्रिक टन (एमएमटी) इतकी होती. गेल्या वर्षाच्या तुलनेत ही वाढ 6.55% इतकी आहे. 81.1 एमएमटी ची एकूण वाहतूक आणि 5,959,112 दशलक्ष टीईयु ची कंटेनर वाहतूक ही बंदराच्या स्थापनेपासून एका वर्षात हाताळलेली सर्वाधिक माल वाहतूक आहे. 

बंदराच्या कामगिरीमधील समर्पित मेहनतीबद्दल कर्मचारी आणि भागधारकांचे कौतुक करताना, जेएनपीएचे अध्यक्ष संजय सेठी म्हणाले, "जेएनपीएसाठी 2022 हे वर्ष अभूतपूर्व होते, कारण आपण बंदरातील आतापर्यंतची सर्वाधिक वाहतूक हाताळण्याचा टप्पा गाठला. आपल्या सर्व टर्मिनल ऑपरेटर्सची कामगिरी उल्लेखनीय आहे. याशिवाय, 2022 मध्ये, आपण भारतातील पहिले 100% लँडलॉर्ड मॉडेल राबवणारे प्रमुख बंदर, सर्वोत्तम कामगिरी करणारे बंदर बनलो आणि विविध प्रतिष्ठित पुरस्कारांनी आपल्याला गौरविण्यात आले. आपल्या बंदराची कामगिरी दररोज आणखी सुधारण्यासाठी आणि जेएनपीएच्या यशोगाथेमध्ये योगदान देण्यासाठी अथक पाठिंबा आणि प्रयत्नांसाठी मी सर्व भागधारक आणि कर्मचाऱ्यांचे आभार मानतो.”

बंदराच्या कामगिरीची दखल घेत, अलीकडेच सागरी आणि लॉजिस्टिक अवॉर्ड्स 2022 मध्ये बंदराला 'वर्षातील प्रमुख बंदर- कंटेनराइज्ड पोर्ट श्रेणी' पुरस्कार प्रदान करण्यात आला, आणि इकॉनॉमिक टाइम्स इन्फ्रा फोकस अवॉर्ड्स 2022 मध्ये 'मोस्ट अॅडमायर्ड सेंट्रल एंटिटी प्रमोटिंग पीपीपी (पोर्ट्स) अवॉर्ड' देऊन गौरविण्यात आले. 

 

* * *

PIB Mumbai | S.Patil/R.Agashe/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1888428) Visitor Counter : 155


Read this release in: English