संसदीय कामकाज मंत्रालय

भारत वसुधैव कुटुंबकम् या भावनेनुसार काम करत आहे.: लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला


लोकशाहीची जननी असलेल्या भारतात  होत असलेल्या G20 संमेलनाचे स्वागत : लोकसभा अध्यक्ष

नेतृत्व, लोकशाही आणि प्रशासन एकमेकांना पूरक :लोकसभा अध्यक्ष

लोकशाहीच्या जननी असलेल्या भारतात हजारो वर्षांपासून लोकशाही पद्धतीने निर्णय घेतले जात आहेत : लोकसभा अध्यक्ष

नेतृत्वातून देश आणि समाजाला नवी उर्जा, नवी दिशा मिळते :लोकसभा अध्यक्ष

छत्रपती शिवाजी महाराज , लोकमान्य टिळक, महात्मा ज्योतिबा फुले, गोपाळकृष्ण गोखले यांसह पुण्याच्या सर्व सुपुत्रांना नमन :लोकसभा अध्यक्ष

पुणे येथील एमआयटी विद्यापीठात आयोजित कार्यक्रमाला लोकसभेच्या अध्यक्षांनी केले संबोधित .

Posted On: 24 DEC 2022 9:20PM by PIB Mumbai

 

लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आज पुणे येथील एमआयटी विद्यापीठात आयोजित एका कार्यक्रमात विद्यार्थी, शिक्षक आणि इतर मान्यवरांना संबोधित केले. यावेळी बिर्ला यांनी पुण्याला आल्याबद्दल आपल्याला झालेला आनंद व्यक्त केला. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक, महात्मा ज्योतिबा फुले, गोपाळ कृष्ण गोखले यांच्यासह पुण्याच्या सर्व सुपुत्रांना नमन केले. विद्यापीठ म्हणजे शिक्षणाचे मंदिर असे म्हणत त्यांनी विद्यापीठातून नवीन चिंतन, नवीन विचारांचे सृजन होते व त्यामुळे सामाजिक तसेच आर्थिक परिवर्तन शक्य होते.

शासन प्रशासनात तरुणांच्या सहभागाचा उल्लेख करत बिर्ला यांनी आशा व्यक्त केली की युवाशक्तीमुळे भारत संपूर्ण विश्वाचे नेतृत्व करेल. आणि विश्वगुरू म्हणून अग्रस्थान मिळवेल.

लोकशाही हा शासनव्यवस्थेचा पाया असल्याचे सांगून बिर्ला म्हणाले की भारत ही लोकशाहीची जननी आहे. भारतात हजारो वर्षांपासून लोकशाही पद्धतीने निर्णय घेतले जातात. देशातील तरुणवर्ग तंत्रज्ञान, संशोधन, नवाचार या माध्यमातून  राष्ट्राचे नवनिर्माण करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 2047 साठीच्या दृष्टीकोनाचा उल्लेख करत बिर्ला यांनी म्हटले की भारताला विकसित राष्ट्र म्हणून साकार करण्यासाठी युवकांना संपूर्ण लक्षपूर्वक परिश्रम करावे लागतील.

नेतृत्व या विषयावर आपले विचार मांडताना बिर्ला यांनी नेतृत्वामुळे देश आणि समाजाला नवी उर्जा, नवीन दिशा मिळते असे सांगितले. नेतृत्व, लोकशाही आणि प्रशासन  एकमेकांशी जोडले  गेले आहेत   आणि  ते एकमेकांना पूरक आहेत, असेही त्यांनी पुढे नमूद केले.  बिर्ला यांनी आर्थिक सामाजिक क्षेत्रापासून ते व्यक्तिगत आणि अध्यात्मिक जीवनातल्या नेतृत्वावर भर दिला आणि या दिशेन् सर्वांनी प्रयत्न करावेत असे आवाहन केले. त्यांनी सामूहिकता आणि सकारात्मक विचारांच्या आधारावरील नेतृत्वावर भर दिला आणि देशाची दिशा लोकशाही  मूल्यांमार्फत ठरवली जावी असे सांगितले.  अमृतकालाचा उल्लेख करत बिर्ला यांनी स्वातंत्र्यसंग्रामानंतर  भारताने  संविधानाचे निर्माण केले.  संविधानाने न्याय़ आणि समानता या मूल्यांसह देशाला मार्गदर्शन केले आहे.

बिर्ला यांनी लोकशाहीची जननी असलेल्या भारतात  आयोजित  जी 20 संमेलनाचे स्वागत केले. जी 20 मध्ये भारताची अध्यक्षता या विषयावर बोलताना ते म्हणाले की भारत वसुधैव कुटुंबकम या मूल्यांच्या  आधारे काम करत आहे. जागतिक महामारी कोरोनाचा उल्लेख करत बिरला यांनी कोरोना कालखंडात भारताने आपल्या माणुसकीच्या मूल्यांनी प्रेरीत होऊन जगभरात लस पोहोचवण्याचे काम केले. भारताचा लोकशाही वारसा या विषयावर बोलताना बिर्ला यांनी भारतीय लोकशाही खूप काळापासून भारताला दिशादर्शन करत आहे, असे सांगितले.

 

अग्रवाल समाजाला बिर्ला यांनी केले संबोधित

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला य़ांनी आज आपल्या पुणे दौऱ्यात अखिल भारतीय अग्रवाल समाजालाही संबोधित केले. अग्रवाल समाजाला परिश्रम करणारा, संस्कारी आणि समर्पित अशी विशेषणे देऊन या समाजाचे देशाची प्रगती आणि समृद्धी यात मोठे योगदान आहे असे बिर्ला म्हणाले.  महाराजा अग्रसेनने दिलेली शिकवण आणि संस्कार अग्रवाल समाजाला समाजसेवा तसेच समाजकल्याणाच्या मार्गात सदैव अग्रणी ठेवते असेही त्यांनी नमूद केले.

शिक्षण, आरोग्यआर्थिक विकास, रोजगारयासारख्या अनेक बाबतीत अग्रवाल समाजाची मुख्य भूमिका असल्याच्या बाबतीत बिर्ला म्हणाले की स्वातंत्र्यसंग्रामापासून ते अमृतकाळापर्यंत अग्रवाल समाजाने सामाजिक, आर्थिक परिवर्तन घडवून आणण्यासाठी अनेक संकल्प सिद्धीस नेले आहेत. यासाठी सर्व अग्रवाल समाजाची बिर्ला यांनी प्रशंसा केली आणि आनंद व्यक्त केला. संकटात मानव सेवा हा अग्रवाल समाजाचा वारसा असल्याचे सांगून कोरोना कालखंडातही अग्रवाल समाजाने सामूहिक प्रयासाने जागतिक कठिण काळातही समर्पण आणि त्यागाची भावनेने काम केले तसेच समाजाला लाभ मिळवून दिला, असे त्यांनी सांगितले.

 

बिर्ला यांनी खासदार गिरीश बापट यांची भेट घेतली.

बिर्ला यांनी पुण्याचे खासदार गिरीश बापट यांची दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात भेट घेतली. त्यांनी डॉक्टरांबरोबर बापट यांच्या तब्येतीबाबत तसेच उपचारांबाबत चर्चा केली. बापट यांना लवकर बरे वाटावे अशी सदिच्छा बिर्ला यांनी व्यक्त केली.

***

S.Kakade/V.Sahajrao/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1886417) Visitor Counter : 222


Read this release in: English