नौवहन मंत्रालय
जेएनपीएला मिळाली एमएसईडीसीएलची फ्रँचायझी
कार्यक्षम आणि विश्वासार्ह वीज पुरवठा करण्याची होणार सुविधा
Posted On:
24 DEC 2022 3:05PM by PIB Mumbai
मुंबई, 23 डिसेंबर, 2022:
जेएनपीए अर्थात जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण भारतातील सर्वोत्तम कामगिरी करणारे बंदर आहे. जेएनपीएला एमएसईडीसीएलची वीज वितरण फ्रँचायझी मिळाली आहे. एमएसईडीसीएलची वीज वितरण फ्रँचायझीचा पहिला टप्पा 21 डिसेंबर 2022 रोजी कार्यान्वित करण्यात आला. याचबरोबर जेएनपीए टाउनशिप येथे स्मार्ट स्ट्रीट लाइटिंग सिस्टीम सुद्धा सुरू करण्यात आली. वीज वितरण फ्रँचायझीचे उद्घाटन जेएनपीएचे अध्यक्ष संजय सेठी व उपाध्यक्ष उन्मेष शरद वाघ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जेएनपीएचे सर्व विभागाध्यक्ष आणि जेएनपीएमधील सर्व टर्मिनल ऑपरेटरचे प्रतिनिधी उपस्थित होते.

जेएनपीएला प्राप्त झालेल्या एमएसईडीसीएलच्या वीज वितरण फ्रँचायझीचे महत्त्व अधोरेखित करताना जेएनपीएचे अध्यक्ष संजय सेठी म्हणाले, “एमएसईडीसीएलसोबत सामंजस्य (एमओयू) करार करून वीज वितरण फ्रँचायझी (डीएफ) प्राप्त करणारे जेएनपीए पहिले प्रमुख बंदर ठरले आहे. आमच्यासाठी हे एक मोठे यश आहे. यामुळे जेएनपीए डीएफ क्षेत्रातील वीज ग्राहकांना, हरित उर्जा स्त्रोतांकडून वीज पुरवठ्याचा लाभ घेता येईल.”
"आम्ही केंद्रीय बंदरे, जहाज वाहतूक व जलमार्ग मंत्रालयाच्या मेरीटाईम इंडिया व्हिजन 2030 उपक्रमांतर्गत जेएनपीए टाउनशिप येथे जीएसएम/आरएफ आधारित व रिमोटने नियंत्रित होणारी स्मार्ट स्ट्रीट लाइटिंग सिस्टीम कार्यान्वित केली आहे. हा आमचा एक पथदर्शी प्रकल्प आहे,"असे सेठी यांनी सांगितले.

जेएनपीएने महावितरणच्या आवश्यकतेनुसार इलेक्ट्रिकल नेटवर्कबाबत सुधारणा केली असून कनेक्शन पॉईंट्सवर स्मार्ट मीटरिंग स्थापित केले आहेत. यामध्ये बीओटी ऑपरेटर आणि जेएनपीए डीएफ क्षेत्रातील इतर एचटी ग्राहकांचा समावेश आहे ते आता महावितरणचे थेट ग्राहक बनले आहेत. तसेच, स्मार्ट स्ट्रीट लाइटिंग सिस्टीम प्रकल्प ऊर्जा कार्यक्षम असून बंदराच्या इतर भागात सुद्धा सुरू करण्याचे प्रस्तावित आहे. अशा प्रकारच्या उपक्रमांमधून शाश्वत विकासासाठी जेएनपीएची वचनबद्धता अधोरेखित होते.
जेएनपीए विषयी :
जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण (जेएनपीए) , नवी मुंबई येथील भारतातील सर्वात मोठे कंटेनर हाताळणी करणारे बंदर आहे. 26 मे 1989 मध्ये या बंदराची स्थापना झाली.
सध्या जेएनपीए येथे पाच कंटेनर टर्मिनल्स कार्यरत आहेत. ज्यामध्ये जवाहरलाल नेहरू पोर्ट कंटेनर टर्मिनल (जेएनपीसीटी), न्हावा शेवा इंटरनॅशनल कंटेनर टर्मिनल (एनएसआयसीटी), गेटवे टर्मिनल्स इंडिया प्रा. लि. (जीटीआयपीएल), न्हावा शेवा इंटरनॅशनल गेटवे टर्मिनल (एनएसआयजीटी) आणि नव्याने स्थापन करण्यात आलेल्या भारत मुंबई कंटेनर टर्मिनल्स प्रायव्हेट लिमिटेड (बीएमसीटीपीएल)चा समावेश आहे. या बंदरात सर्वसाधारण कार्गोकरिता शॅलो वॉटर बर्थ आणि आणखी एक लिक्विड कार्गो टर्मिनल आहे, ज्याचे व्यवस्थापन बीपीसीएल-आयओसीएल कन्सोर्टीयमद्वारे चालते.
***
M.Chopade/S.kakade/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1886279)
Visitor Counter : 168