संसदीय कामकाज मंत्रालय
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला 24 डिसेंबर रोजी, पुणे दौऱ्यावर; विविध कार्यक्रमांमध्ये होणार सहभागी
प्रविष्टि तिथि:
23 DEC 2022 7:45PM by PIB Mumbai
नवी दिल्ली/पुणे, 23 डिसेंबर 2022
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला शनिवार, दि. 24 डिसेंबर रोजी पुण्याच्या एकदिवसीय दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या विविध कार्यक्रमांना ओम बिर्ला उपस्थित राहणार आहेत.

लोकसभा अध्यक्ष बिर्ला सकाळी 8.10 मिनिटांनी पुणे येथे पोहोचतील. सकाळी 9.40 ते 10.20 वाजेपर्यंत ते राजभवनामध्ये मान्यवरांची भेट घेतील. सकाळी 10.35 ते 10.55 पर्यंत ते येरवडा येथील अग्रवाल प्रशालेमध्ये जाणार आहेत. सकाळी 11.00 ते 12.30 पर्यंत अध्यक्ष बिर्ला येरवडा येथील डेक्कन मैदानावर भरणा-या अग्रवाल समाजाच्या संमेलनामध्ये सहभागी होतील.
यानंतर दुपारी 1.30 पासून ओम बिर्ला एमआयटी विद्यापीठामध्ये विद्यार्थ्यांबरोबर ‘नेतृत्व, लोकशाही, सुशासन आणि शांती’’ या विषयावर संवाद साधणार आहेत. त्यानंतर ते राजभवनामध्ये मान्यवरांची भेट घेतील.
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला सायंकाळी 6.50 मिनिटांनी नवी दिल्लीला रवाना होतील.
S.Kakade/S.Bedekar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1886151)
आगंतुक पटल : 206
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English