ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
बीआयएसच्यावतीने गुणवत्ता चाचणी कर्मचाऱ्यांसाठी ‘कॅप्सूल कोर्स’चे आयोजन
Posted On:
23 DEC 2022 5:42PM by PIB Mumbai
मुंबई, 23 डिसेंबर 2022
बीआयएस म्हणजेच ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्डच्या मुंबई शाखा कार्यालयाच्या वतीने पॅकबंद पेयजल उद्योग व्यवसायामध्ये पाण्याची गुणवत्ता परीक्षणाचे कार्य करणाऱ्या कर्मचारी वर्गासाठी 22 आणि 23 डिसेंबर, 2022 असा दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम (कॅप्सूल कोर्स) भिवंडी येथील रिलाएबल ॲनालिटिकल लॅबोरेटरी प्रा. लि. मध्ये आयोजित करण्यात आला.

या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये पॅकबंद पेयजल उद्योगासाठी चाचणीचे मापदंड सांगितले.बीआयएसच्या वैज्ञानिक अधिकाऱ्यांनी भारतीय मानक IS 14543 पॅक बंद पिण्याचे पाणी, त्याचे नमुने तयार करणे आणि वेगवेगळ्या अटी, नियमानुसार चाचणीचे मापदंड/मानके, उत्पादन नियमावलीचे स्पष्टीकरण आणि इतर वैशिष्ट्यपूर्ण मार्गदर्शक तत्त्वे आणि सर्व तपशीलाच्या नोंदी ठेवणे, याविषयी माहिती देऊन, अशा विविध गोष्टी करणे का आवश्यक आहे, याची माहिती दिली.
पॅकबंद पाणी तयार करणे आणि ते विक्री करण्याच्या व्यवसायासाठी अनुदानासाठी मार्गदर्शक नियमावली /समावेशन /नूतनीकरण अशा सर्व कामासाठी ऑनलाइन पोर्टल मानक ऑनलाइन आणि ई-बीआयएसची वैशिष्ट्ये समजून घेणे आवश्यक असल्याचे यावेळी सांगण्यात आले. महत्त्वाच्या आणि गंभीर मानकांची चाचणी कशी केली जाते, याचे प्रात्यक्षिक घेण्यासाठी प्रयोगशाळांना भेटी देखील देण्यात आल्या. वरील विषयांवर सराव करून घेण्यात आला आणि कार्यशाळा घेण्यात आल्या.
या दोन दिवसीय अभ्यासक्रमामध्ये सहभागी झालेल्या कर्मचारी वर्गाकडून अभिप्राय घेण्यात आले. तसेच बीआयएसने घेतलेल्या या उपक्रमाद्वारे सहभागीतांनी चाचणी पद्धती आणि प्रशिक्षणाच्या विविध पैलूंवर अधिक ज्ञान प्राप्त केले.

बीआयएसविषयी माहिती –
ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड (बीआयएस) ही बीआयएस कायदा 2016 अंतर्गत स्थापन झालेली भारताची राष्ट्रीय मानक संस्था आहे. बीआयएसचा मुख्य उपक्रम म्हणजे, मानके निश्चित करणे , उत्पादन प्रमाणपत्र देणे, प्रयोगशाळेतील चाचणी करणे आणि प्रणाली प्रमाणन आहे. बीआयएस सुरक्षित, विश्वासार्ह आणि दर्जेदार वस्तू पुरवून, ग्राहकांच्या दृष्टीने त्यांना असलेले आरोग्य धोके कमी करून, पर्यावरणाचे रक्षण करण्याचे काम करीत आहे आणि राष्ट्रीय अर्थव्यवस्थेत योगदान देत आहे. बीआयएसची मानक आणि उत्पादन प्रमाणन योजना ग्राहक आणि उद्योगांना फायदा होण्याव्यतिरिक्त, विविध सार्वजनिक धोरणांना, विशेषत: उत्पादनांना सुरक्षा, ग्राहक संरक्षण, अन्न सुरक्षा, पर्यावरण संरक्षण, यांनाही पाठबळ देते.
S.Kakade/S.Bedekar/P.Malandkar
(Release ID: 1886110)
Visitor Counter : 159