ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
मेसर्स ग्लोमेट अलॉयज एलएलपीच्या पनवेल येथील आवारात भारतीय मानक संस्थेची सक्तवसुली कारवाई अंतर्गत छापेमारी
Posted On:
21 DEC 2022 10:57AM by PIB Mumbai
भारतीय मानक संस्थेच्या (बीआयएस) मानक चिन्हाचा गैरवापर केल्याबाबतच्या तक्रारीची दखल घेत, बीआयएस च्या मुंबई येथील कार्यालय- II च्या अधिकाऱ्यांनी 19.12.2022 रोजी, मेसर्स ग्लोमेट अलॉयज एलएलपीच्या मालकीच्या रायगड जिल्ह्यात पनवेल इथल्या, रस्ता क्रमांक: 12, प्लॉट. क्रमांक: 1106, KWC, कळंबोली स्टील मार्केट येथील आस्थापनेच्या आवारात सक्तवसुली कारवाई अंतर्गत छापेमारी केली.
वरील आवारात छापेमारी दरम्यान, मेसर्स ग्लोमेट अलॉयज एलएलपी, बीआयएस मानक चिन्हाचा गैरवापर करताना आढळून आले. यावेळी 300 टन स्टेनलेस स्टील वेल्डेड पाईप्स जप्त करण्यात आले. हे साहित्य आयएसआय (ISI) मार्क आणि IS 6911 चिन्हांकित केलेले आढळले, जे प्रत्यक्षात स्टेनलेस स्टील प्लेट्स, शीट आणि स्ट्रिप्सशी संबंधित आहे. या प्रकरणी न्यायालयात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. बीआयएस कायदा-2016 नुसार, वैध परवान्याशिवाय, कोणतीही व्यक्ती मानक चिन्हाशिवाय अशा कोणत्याही वस्तूंचे उत्पादन, आयात, वितरण, विक्री, भाड्याने घेणे, भाड्याने देणे, साठा अथवा विक्रीसाठी प्रदर्शन करू शकत नाही. परवाना धारक, विक्रेते आदींसाठीचा दंड आणि दायित्व, याबाबत बीआयएस कायदा-2016 अंतर्गत असलेली माहिती नागरिक पुढील लिंक वर पाहू शकतील-
( https://www.bis.gov.in/wp-content/uploads/2020/12/BIS-Act-2016.pdf ).
बीआयएस मानक चिन्हाचा गैरवापर केल्यावर, बीआयएस कायदा 2016 अंतर्गत दोन वर्षांपर्यंत कारावास किंवा किमान 2,00,000 रुपयांपर्यंतचा दंड अथवा दोन्ही शिक्षा लागू आहेत. म्हणून, सर्व ग्राहकांना बीआयएस केअर अॅप (अँड्रॉइड आणि आयओएस मोबाइल दोन्हीमध्ये उपलब्ध) वापरासाठी प्रोत्साहन दिले जाती आणि http://www.bis.gov.in या बीआयएस च्या वेबसाइटला भेट देऊन खरेदी करण्यापूर्वी उत्पादनावर ISI मार्कची वास्तविकता तपासण्याची विनंती केली जाते. अनेकदा असे आढळून आले आहे की, जास्त नफा कमावण्यासाठी बनावट ISI चिन्हांकित उत्पादने तयार करून ग्राहकांना विकली जातात. नागरिकांना विनंती करण्यात आली आहे की, कोणत्याही उत्पादनावर ISI मार्कचा गैरवापर केल्याचे आढळून आले तर, प्रमुख, MUBO-II, पश्चिम विभाग कार्यालय, बीआयएस, 2रा मजला, NTH(WR), F-10, एमआयडीसी, अंधेरी (पूर्व), मुंबई - 400 093 येथे कळवावे. या तक्रारी ईमेल द्वारे पुढील पत्त्यावर देखील पाठवता येतील- hmubo2@bis.gov.in. अशा माहितीचा स्रोत गोपनीय ठेवला जाईल.
बीआयएस
ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड, अर्थात, भारतीय मानक संस्था (बीआयएस) ही भारताची राष्ट्रीय मानक संस्था असून, बीआयएस कायदा 2016 अंतर्गत स्थापन करण्यात आली आहे. मानक प्रस्थापित करणे, उत्पादन प्रमाणन, प्रयोगशाळा चाचणी आणि प्रणाली प्रमाणन ही बीआयएस ची प्रमुख कामे आहेत. सुरक्षित, विश्वासार्ह आणि दर्जेदार वस्तू प्रदान करणे, ग्राहकांच्या आरोग्याबाबतचे धोके कमी करणे, पर्यावरणाचे रक्षण करणे इ. प्रदान करून बीआयएस देशाच्या अर्थव्यवस्थेत योगदान देत आहे. बीआयएसची मानके आणि उत्पादन प्रमाणन योजना, ग्राहक आणि उद्योगांना फायदा देण्याबरोबर, उत्पादन सुरक्षा, ग्राहक संरक्षण, अन्न सुरक्षा, पर्यावरण संरक्षण, बांधकाम इ. यासारख्या सार्वजनिक धोरणांना देखील सहाय्य करतात.
***
S.Thakur/R.Agashe/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1885325)
Visitor Counter : 192