अन्न प्रक्रिया उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

अन्न प्रक्रिया उद्योगांना प्रोत्साहन

Posted On: 20 DEC 2022 4:03PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 20 डिसेंबर 2022

 

अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालय, 2021-22 ते 2026-27 या सहा वर्षांच्या कालावधीत 10,900 कोटी रुपये खर्चाची “अन्न प्रक्रिया उद्योगासाठी उत्पादन संलग्न प्रोत्साहन योजना (PLISFPI)” ही केंद्रीय क्षेत्र योजना राबवत आहे. इतर गोष्टींबरोबरच ही योजना भारताच्या नैसर्गिक संसाधनांच्या अनुषंगाने अन्न उत्पादन जगज्जेते तयार करण्यात मदत करते आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारतीय ब्रँडच्या खाद्य उत्पादनांना पाठबळ देते.

कृषी-अन्न उत्पादनांची निर्यात (5,6,14 वगळता आयटीसी अध्याय 2-23) 2015-16 मधील 29.67 अब्ज अमेरिकन  डॉलर वरून 2021-22 मध्ये 46.11 अब्ज अमेरिकन डॉलर पर्यंत वाढली आहे, ज्याचा चक्रवाढ वार्षिक वृद्धी दर (सीएजीआर) 7.62% दर्शवित आहे आणि मूल्यवर्धित प्रक्रिया-अन्न उत्पादनांची निर्यात (आयटीसी अध्याय 16-23) 2015-16 मध्ये 4.855 अब्ज अमेरिकन डॉलर वरून 2021-22 मध्ये 10.420 अब्ज अमेरिकन डॉलर पर्यंत वाढून 13.57% चा चक्रवाढ वार्षिक वृद्धी दर दर्शवतो.

देशभरातील अन्न प्रक्रिया क्षेत्रांचा सर्वांगीण विकास सुनिश्चित करण्यासाठी, अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालय केंद्रीय क्षेत्र छत्री योजना – प्रधानमंत्री किसान संपदा योजना (पीएमकेएसवाय), केंद्र प्रायोजित प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना औपचारिकरण (पीएमएफएमई) आणि केंद्रीय क्षेत्र उत्पादन संलग्न प्रोत्साहन योजना (पीएलआयएसएफपीआय) लागू करत आहे. प्रधानमंत्री किसान संपदा योजनेच्या घटक योजनांतर्गत, अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालय अन्न प्रक्रिया उद्योग/युनिट्स/प्रकल्पांच्या स्थापनेसाठी अनुदान-साहाय्य स्वरूपात मुख्यतः पतपुरवठा संलग्न आर्थिक सहाय्य (भांडवली अनुदान) प्रदान करते. मंत्रालय पीएमएफएमई योजनेद्वारे सूक्ष्म अन्न प्रक्रिया उपक्रम सुरु करण्यासाठी /अद्ययावत करण्यासाठी आर्थिक, तांत्रिक आणि व्यावसायिक सहाय्य प्रदान करते, तर पीएलआयएसएफपीआय चे लक्ष्य अन्न प्रक्रिया क्षेत्रातील चॅम्पियन ब्रँड तयार करून अन्न प्रक्रिया क्षमतेचा विस्तार सुलभ करणे हे आहे.

अन्न प्रक्रिया उद्योग राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांनी आज लोकसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.

 

* * *

N.Chitale/V.Joshi/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1885099)
Read this release in: English , Urdu , Tamil , Telugu