जलशक्ती मंत्रालय
स्वच्छ भारत अभियान ग्रामीण – II ला चालना देण्यासाठी 'स्वच्छता ही सेवा' मोहीम
Posted On:
19 DEC 2022 7:31PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 डिसेंबर 2022
'स्वच्छता ही सेवा- 2022' ही मोहीम 15 सप्टेंबर 2022 ते 2 ऑक्टोबर 2022 या कालावधीत आयोजित करण्यात आली होती. कचराभूमीची स्वच्छता, स्वच्छतेच्या कार्यामध्ये नागरिकांचा जास्तीत जास्त सहभाग आणि स्वच्छ भारत अभियान ग्रामीण II ला चालना देणे ही या मोहिमेची उद्दिष्टे होती. गावांवर लक्ष केंद्रीत करत तिथला परिसर स्वच्छ करण्यावर भर देत राज्यव्यापी स्वच्छता ही सेवा मोहीम राबवण्याच्या सूचना सर्व राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेशांना देण्यात आल्या होत्या.
एकात्मिक व्यवस्थापन माहिती व्यवस्था या ऑनलाइन सिस्टीममध्ये सर्व राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेशांनी दिलेल्या अहवालानुसार या मोहिमेत स्वच्छता कामांमध्ये श्रमदानासाठी 9.81 कोटी लोकांनी भाग घेतला. 1.59 लाख ग्रामपंचायतींनी एकल वापराच्या प्लास्टिकवर बंदी घालण्याचा ठराव मंजूर केला. 1.68 लाख सरपंचांनी ओडीएफ प्लस घटकांवरील सरपंच संवादात भाग घेतला.
स्वच्छता हीच सेवा ही मोहीम स्वच्छ भारत मिशन ग्रामीण या अंतर्गत माहिती शिक्षण आणि संवाद या घटकांवर आधारित होती. यासाठी कार्यक्रमातील घटकांवर खर्च करण्याच्या एकूण निधीपैकी तीन टक्के निधी राज्य तसेच केंद्रशासित प्रदेशांना वापरता येऊ शकतो. त्यामुळे 'स्वच्छता हीच सेवा' या मोहिमेसाठी राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशांना कोणताही वेगळा निधी दिला किंवा मंजूर केला गेला नाही.
जलशक्ती राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांनी आज राज्यसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.
N.Chitale/V.Sahjrao/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1884923)