माहिती आणि प्रसारण मंत्रालय
केंद्र सरकारच्या सेवापूर्तीची 8 वर्ष, यानिमित्ताने ‘शासकीय जनकल्याण योजना’ व ‘गतीशक्ती’ विषयावर बहु-माध्यम चित्रप्रदर्शनाचे आयोजन
केंद्रीय संचार ब्यूरो, औरंगाबाद, दक्षिण-मध्य रेल्वे आणि जिल्हा प्रशासन, जालना यांच्या सहकार्याने जालना रेल्वे स्टेशनमध्ये माहिती प्रदर्शनाचे आयोजन
प्रविष्टि तिथि:
16 DEC 2022 4:22PM by PIB Mumbai
जालना/पुणे, 16 डिसेंबर 2022
भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालया अंतर्गत येणाऱ्या केंद्रीय संचार ब्यूरो, क्षेत्रीय कार्यालय, औरंगाबाद (कार्यक्षेत्र- औरंगाबाद, जालना व बुलढाणा), दक्षिण-मध्य रेल्वे आणि जिल्हा प्रशासन, जालना यांच्या सहकार्याने केंद्र शासनाच्या 8 वर्ष सेवापूर्ती निमित्ताने ‘शासकीय जनकल्याण योजना’ व ‘गतीशक्ती’ विषयावर बहु-माध्यम प्रदर्शनाचे आयोजन दिनांक 17 ते 21 डिसेंबर 2022 (शनिवार ते बुधवार) असे पाच दिवस करण्यात अले आहे. सकाळी 09 ते रात्री 09 पर्यंत जालना रेल्वे स्टेशन येथे हे प्रदर्शन पाहण्यास खुले असेल.
चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन रावसाहेब दानवे पाटील, केंद्रीय राज्यमंत्री, रेल्वे, कोळसा व खाण मंत्रालय, भारत सरकार तसेच जालना जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे आणि जालना जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. विनोद राठोड यांच्या उपस्थितीत होणार आहे.
विविध सरकारी योजनांची माहिती देणारे स्टॉल देखील याठिकाणी असणार आहेत. या प्रदर्शनाला लोकप्रतिनिधींबरोबरच जालना शहरातील विविध शाळा, महाविद्यालय विद्यार्थी भेट देणार आहेत. प्रदर्शन स्थळी सांस्कृतिक कार्यक्रमाचेही (पथनाट्य) आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन केंद्रीय संचार ब्यूरो, औरंगाबाद तर्फे करण्यात आले आहे.
*****
CBC- Pune/Shilpa Nilkanth/PM
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1884138)
आगंतुक पटल : 224
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English