संरक्षण मंत्रालय
गोवा येथे सशस्त्र दल न्यायाधिकरणाच्या सर्किट बेंचचे 21 डिसेंबर 22 रोजी होणार उद्घाटन
Posted On:
13 DEC 2022 4:57PM by PIB Mumbai
गोवा, 13 डिसेंबर 2022
सशस्त्र दल न्यायाधिकरणचे मुंबई येथील प्रादेशिक खंडपीठ, डिसेंबर 2022 मध्ये प्रथमच गोव्यात सर्किट बेंच सुरु करणार आहे. यामुळे गोव्यातील सध्या कार्यरत जवान आणि माजी सैनिकांसाठी न्याय मिळण्याची सुविधा गोव्यातच उपलब्ध होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाने गोव्यातील त्यांची जागा सशस्त्र दल न्यायाधिकरणाला वापरण्यासाठी संमती दिली आहे. गोव्यातील सर्किट बेंचचा उद्घाटन समारंभ 21 डिसेंबर 2022 रोजी आयोजित करण्यात आला आहे. नवी दिल्लीतील सशस्त्र दल न्यायाधिकरणाचे अध्यक्ष माननीय न्यायमूर्ती राजेंद्र मेनन उद्घाटन समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
माननीय न्यायमूर्ती यू सी श्रीवास्तव, प्रादेशिक खंडपीठ, लखनौ आणि माननीय व्हाइस अॅडमिरल अभय आर कर्वे (निवृत्त) पीव्हीएसएम , एव्हीएसएम , प्रादेशिक खंडपीठ, मुंबई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने यावर्षी जवळपास 700 प्रकरणे निकाली काढली आहेत.
* * *
(Source: DefPro) | PIB Panaji | S.Kakade/S.Chavan/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBPanaji
/PIBPanaji
/pib_goa
pibgoa[at]gmail[dot]com
/PIBGoa
(Release ID: 1883099)
Visitor Counter : 190