अणुऊर्जा विभाग

कोलंबिया मध्ये बोगोटा येथे झालेल्या 19व्या आंतरराष्ट्रीय कनिष्ठ विज्ञान ऑलिम्पियाड (आय जे एस ओ) 2022 मध्ये 6 सुवर्ण पदकांसह भारत अव्वलस्थानी

Posted On: 13 DEC 2022 3:51PM by PIB Mumbai

मुंबई, 13 डिसेंबर 2022 

 

कोलंबिया मध्ये बोगोटा येथे झालेल्या 19व्या आंतरराष्ट्रीय कनिष्ठ विज्ञान ऑलिम्पियाड  (आय जे एस ओ ) 2022 मध्ये भारताने 6 सुवर्ण पदकांसह अव्वलस्थान पटकावले. 2 ते 12 डिसेंबर, 2022 दरम्यान झालेल्या या ऑलिम्पियाडमध्ये  एकूण 20 सुवर्ण, 42 रौप्य आणि 59 कांस्य पदके देण्यात आली. 

भारताच्या अरित्रा  मल्होत्रा, राजदीप मिश्रा, देवेश पंकज भैय्या, बानिब्रत माझी आणि अवनीश बन्सल या विद्यार्थ्यांनी  आय जे एस ओ  2022 मध्ये सुवर्ण पदक पटकावले. अरित्रा , अवनीश आणि राजदीप या तीन सदस्यांच्या संघाने प्रायोगिक स्पर्धेत अन्य संघासह संयुक्तपणे कांस्यपदक प्राप्त केले.आंतरराष्ट्रीय कनिष्ठ विज्ञान ऑलिम्पियाड मध्ये भारताने सलग तीन वर्ष (2019, 2021, 2022; (आय जे एस ओ ) 2020 मध्ये आयोजित करण्यात आले नव्हते) सुवर्ण पदकांची कमाई केली असून  एकंदर चार वेळा भारताने   (या व्यतिरिक्त  वर्ष 2014 मध्ये ) (आय जे एस ओ )  पदकतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे. 

भारताच्या संघासोबत  प्रा. चित्रा जोशी (निवृत्त, आर. रुईया ज्युनियर कॉलेज, मुंबई), डॉ. सुभोजित सेन (UM-DAE CEBS, मुंबई),  विशाल देव अशोक (एस, आय ई एस  कला आणि विज्ञान महाविद्यालय, मुंबई) हे तीन मार्गदर्शक आणि  वैज्ञानिक निरीक्षक जे.पी. गद्रे (निवृत्त, आबासाहेब गरवारे महाविद्यालय, पुणे)  होते. 

यंदाच्या आय जे एस ओ  मध्ये 35 देशांतील 203 विद्यार्थी सहभागी झाले होते. यंदाची स्पर्धा मुळात युक्रेनमधील कीव येथे होणार होती. मात्र  युक्रेनमधील युद्धामुळे ती बोगोटा, कोलंबिया येथे घेण्याचा निर्णय ऑगस्ट 2022 मध्ये  घेण्यात आला.

स्पर्धेत दोन सैद्धांतिक परीक्षांचा समावेश असतो. (बहुपर्यायी  आणि दीर्घ प्रश्न) आणि एक प्रायोगिक परीक्षा (तीन विद्यार्थ्यांच्या गटांकडून  सादर होणारी )असते. . यावर्षी या स्पर्धेतील अनेक गोष्टी या आंतरविद्याशाखीय होत्या. या प्रयोगांपैकी एक उदाहरण द्यायचे झाले तर  न्यूरॉन्सचे कार्य आणि गेट्स सक्रिय करण्यासाठी न्यूरोट्रांसमीटरच्या क्षमतेचे मॉडेल बनवण्यात आले जे यामधून इलेक्ट्रिकल सिग्नल ट्रिगर करतात. त्यानंतर विद्यार्थ्यांना या गेट्सच्या माध्यमातून  मालिका किंवा समांतर प्रतिरोधकांच्या साहाय्याने इलेक्ट्रिकल सर्किट्सची  संकल्पना  तयार करून उत्तेजक न्यूरल सिग्नलचे अर्थपूर्ण वाचन करणे आवश्यक होते.

रसायनशास्त्रातील दुसरे उदाहरण म्हणजे द्रव पॉलिमरचे आण्विक वजन मोजण्यासाठी फ्लो डायनॅमिक्सचा वापर करून द्रव चिकटपणाचे मोजमाप वापरले गेले. जीवशास्त्रदेखील याला अपवाद नव्हते. जिथे विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या वनस्पतींमधून अँथोसायनिन रंगद्रव्ये काढायची होती आणि आम्लयुक्त आणि मूलभूत खाद्यपदार्थांमध्ये फरक करण्यासाठी एक कार्यक्षम pH निर्देशक म्हणून त्यांचा उपयोग करायचा होता, ही एक अतिशय रासायनिक संकल्पना आहे. सैद्धांतिकदृष्ट्या, मक्याच्या वनस्पतींमधून इथेनॉल काढण्या संदर्भातील प्रश्नाने विद्यार्थ्यांना उद्योग प्रक्रियेची चांगली कल्पना मिळाली, कार्यक्षम आणि स्वस्त बायोकेमिकल प्रक्रियांवर लक्ष केंद्रित केले. 

वर्ष 2022 मधील  ही शेवटची आंतरराष्ट्रीय ऑलिम्पियाड स्पर्धा होती. या वर्षी, गणित आणि विज्ञान ऑलिम्पियाडमध्ये सहभागी झालेल्या 30 भारतीय विद्यार्थ्यांपैकी 12 विद्यार्थ्यांनी सुवर्ण, 13 रौप्य आणि 5 कांस्यपदके  जिंकली आहेत.

 

* * *

PIB Mumbai | S.Kakade/B.Sontakke/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1883073) Visitor Counter : 157


Read this release in: English