परराष्ट्र व्यवहार मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

पारपत्रासाठी सादर करण्यात आलेल्या अर्जांवर प्रक्रिया करण्यासाठी मुंबईच्या प्रादेशिक पारपत्र कार्यालयाच्या अखत्यारीतील सर्व कार्यालयांचे कामकाज येत्या तीन शनिवारी देखील सुरु राहणार

Posted On: 09 DEC 2022 7:34PM by PIB Mumbai

मुंबई, 9 डिसेंबर 2022

नागरिकांना पारपत्राबाबतच्या कामासाठी लवकरात लवकर भेटीची वेळ(अपॉइंटमेंट) उपलब्ध करून देण्यासंदर्भात केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने हाती घेतलेल्या उपक्रमाचा भाग म्हणून, मुंबईच्या सर्व प्रादेशिक पारपत्र कार्यालयांतील कामकाज येत्या तीन शनिवारी म्हणजेच 10, 17 आणि 24 डिसेंबर 2022 या दिवशी सकाळी 9 ते संध्याकाळी साडेपाच या वेळात नियमित स्वरुपात सुरु राहणार आहे.

10 डिसेंबर 2022 या दिवशी पारपत्र कार्यालयातील कामासाठी ऑनलाईन पद्धतीने भेटीची वेळ उपलब्ध आहे तर 17 डिसेंबर आणि 22 डिसेंबर 2022 या दिवशीच्या भेटीच्या वेळा अनुक्रमे 14 डिसेंबर आणि 21 डिसेंबर 2022 या दिवशी उपलब्ध होतील.

 https://www.passportindia.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज तसेच शुल्क भरून भेटीची नवीन वेळ मिळवण्यासाठी नोंदणी करता येईल. अर्जदाराला पुन्हा याच संकेतस्थळावर लॉग इन करून शुल्क भरले गेल्याची तसेच भेटीच्या वेळेच्या तारखेची खातरजमा करता येईल. भेटीच्या वेळेची निश्चित माहिती देखील पोर्टलवर मिळेल.

ज्या अर्जदारांना पारपत्राच्या कामासाठी नंतरच्या काळातील भेटीच्या वेळा मिळाल्या आहेत किंवा ज्यांना आधीच्या भेटीच्या वेळेच्या दिवशी कार्यालयात हजर राहणे शक्य झाले नसेल त्यांना उपरोल्लेखित तीन शनिवारी त्यांच्या भेटीच्या वेळेसाठी अर्ज करता येईल. अशा अर्जदारांना ही तारीख एकदाच बदलण्याची परवानगी देण्यात आली आहे.   

 

 

 

 

S.Patil/S.Chitnis/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 

 

 


(Release ID: 1882234) Visitor Counter : 180


Read this release in: English