विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
गेल्या दहा वर्षांत देशात जीएम कापसाच्या लागवडीमुळे मध उत्पादनात घट झाल्याचा कोणताही पुरावा नाही - केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह
Posted On:
08 DEC 2022 8:27PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 8 डिसेंबर 2022
गेल्या दहा वर्षांत देशात जीएम कापसाच्या लागवडीमुळे मध उत्पादनात घट झाल्याचे कोणतेही पुरावे नाहीत, अशी माहिती केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) डॉ जितेंद्र सिंह यांनी दिली. बीटी ट्रान्सजेनिक कापूस वाणांचा, बिगर ट्रान्सजेनिक(अनुवांशिक अभियांत्रिकी तंत्रज्ञानाने बदल घडवलेल्या) कापूस जातींच्या तुलनेत एपिस मेलीफेरा प्रजातीच्या मधमाशा, अंडी संगोपन, परागकण आणि मध साठवणुकीवर कोणताही नकारात्मक प्रभाव झाला नसल्याचे 2018-19 आणि 2019-20 या कालावधीत केलेल्या अभ्यासातून दिसून आले आहे, असेही त्यांनी सांगितले.
मर्यादित क्षेत्रीय चाचण्यांदरम्यान म्हणजे जैवसुरक्षा संशोधन पातळी (BRL)-I आणि विविध ठिकाणच्या BRL-II चाचण्यांअंतर्गत राष्ट्रीय तपासणी वरुण आणि झोनल चेक RL1359, करण्यात आली. जीएम मोहरी संकरित धारा मोहरी हायब्रीड-11 (DMH-11) ची तीन वर्षांसाठी (2010-11, 2011-12, 2014-15) चाचणी करण्यात आल्याचे डॉ जितेंद्र सिंह यांनी राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात सांगितले.
DMH-11 ने राष्ट्रीय तपासणीपेक्षा अंदाजे 28% अधिक उत्पन्न आणि क्षेत्रीय तपासणीपेक्षा 37% अधिक उत्पन्न दाखवले आहे.
S.Kakade/S.Mukhedkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1881971)
Visitor Counter : 217