जलशक्ती मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

दूषित भूजल

Posted On: 08 DEC 2022 6:07PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 8 डिसेंबर 2022

 

केंद्रीय भूजल मंडळ (सीजीडब्ल्यूबी), भूजल गुणवत्ता निरीक्षण कार्यक्रम आणि विविध वैज्ञानिक अभ्यासांचा भाग म्हणून प्रादेशिक स्तरावर देशाचा भूजल गुणवत्ता डेटा (अहवाल) तयार करते.

या अभ्यासामधून विविध राज्ये/केंद्रशासित प्रदेशांच्या विविध भागांतल्या भूजलामध्ये असलेल्या मानवी वापरासाठी अनुज्ञेय मर्यादेपेक्षा (बीआयएस नुसार) अधिक नायट्रेट, लोह आणि क्षारता यांसारख्या दूषित घटकांचे अस्तित्व स्पष्ट होते.

त्याशिवाय, केंद्रीय जल आयोग (सीडब्ल्यूसी) देशातील नद्यांच्या अनुषंगाने देशाच्या विविध भागांमधील केंद्रांच्या माध्यमातून भूपृष्ठावरील पाण्याच्या गुणवत्तेबाबतची माहिती मिळवते. ऑगस्ट 2018 ते डिसेंबर 2020 या काळात प्राप्त झालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र, राजस्थान, झारखंड, आसाम, उत्तर प्रदेश, ओडिशा, त्रिपुरा, तामिळनाडू, पश्चिम बंगाल,  आंध्र प्रदेश, केरळ, कर्नाटक, बिहार, मध्य प्रदेश, उत्तराखंड, छत्तीसगड, अरुणाचल प्रदेश, मेघालय, गुजरात, मणिपूर, दिल्ली, तेलंगणा, हिमाचल प्रदेश आणि सिक्कीम या राज्यांमध्ये येणाऱ्या काही नद्यांच्या खोऱ्यांमधील 414 ठिकाणी पिण्याच्या पाण्यासाठी (बीआयएस नुसार) विहित मानकापेक्षा लोहाचे प्रमाण जास्त असल्याचे आढळून आले. त्याशिवाय, 1 जून, 2019 ते 31 मे, 2020 या जलवर्षासाठी 588 पैकी 8 जागांवर पिण्याच्या पाण्यासाठी (बीआयएस नुसार)  नायट्रेट्सचे मूल्य विहित मर्यादेच्या पलीकडे आढळून आले.  

ही माहिती जलशक्ती राज्यमंत्री बिश्वेश्वर तुडू यांनी आज लोकसभेत एका लेखी उत्तरात दिली.

भूजलामधील क्षारता, लोह आणि नायट्रेट या दूषित घटकांनी अंशतः प्रभावित भारतामधील  जिल्ह्यांची राज्यनिहाय संख्या

SI.No.

State/ UT

Salinity (EC above 3000 micro mhos/ cm) (EC: Electrical Conductivity)

Nitrate

(Above 45 mg/l)

Iron

(Above1mg/l)

1

Andhra Pradesh

12

13

12

2

Telangana

9

10

9

3

Assam

   

25

4

Arunachal Pradesh

   

6

5

Bihar

4

32

35

6

Chhattisgarh

1

24

22

7

Delhi

8

9

5

8

Goa

   

2

9

Gujarat

26

32

14

10

Haryana

18

21

20

11

Himachal Pradesh

 

7

5

12

Jammu & Kashmir

 

9

10

13

Jharkhand

 

23

23

14

Karnataka

29

29

22

15

Kerala

4

14

15

16

Madhya Pradesh

20

51

47

17

Maharashtra

28

30

24

18

Manipur

   

4

19

Meghalaya

   

7

20

Nagaland

   

5

21

Odisha

18

29

31

22

Punjab

12

23

16

23

Rajasthan

31

33

33

24

Tamil Nadu

29

32

16

25

Tripura

   

8

26

Uttar Pradesh

14

62

68

27

Uttarakhand

1

4

8

28

West Bengal

9

16

21

29

Andaman& Nicobar

1

 

3

30

Daman & Diu

1

2

 

31

Puducherry

 

2

 
 

Total

Parts of 275 districts in 20 states & UTs

Parts of 507 districts in 23 states & UTs

Parts of 516 districts in 29 states & UTs

 

 

S.Kakade/R.Agashe/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1881904) Visitor Counter : 136


Read this release in: English , Tamil