अर्थ मंत्रालय
मुंबई सीमाशुल्क विभागाने1962 च्या सीमाशुल्क कायद्याची 60 वर्षे केली साजरी, राष्ट्रसेवेसाठी प्राण पणाला लावलेल्या दिग्गज अधिकाऱ्यांचा केला सन्मान
1962 चा सीमाशुल्क कायदा हा सुलभ, लघु आणि उत्तम प्रकारे लिहिलेला कायदा आहे ज्याने आपली यथार्थ सेवा केली : सीबीआयसी अर्थात केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाचे अध्यक्ष
“तंत्रज्ञान आणि माहितीच्या वापराने आपल्या तस्करीविरोधी मोहिमा अधिक तीव्र झाल्या आहेत, योग्य नियंत्रणासह जलद गतीने मालाची उलाढाल आणि आयात निर्यात सुविधा यावर भर देत आहोत”
Posted On:
07 DEC 2022 8:38PM by PIB Mumbai
मुंबई, 7 डिसेंबर 2022
सीमाशुल्क कायदा, 1962 ला 60 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त देशव्यापी कार्यक्रमांचा एक भाग म्हणून केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाने (सीबीआयसी) मुंबईतील न्यू कस्टम हाऊसमध्ये आज (7 डिसेंबर, 2022) एक कार्यक्रम आयोजित केला होता. सीबीआयसीचे अध्यक्ष विवेक जोहरी यांनी मुंबई सीमाशुल्क विभागाने आयोजित केलेल्या 'सीमाशुल्क विभागाची 60 वर्षे आणि या काळात सीमाशुल्क विभागाने जप्त केलेल्या मौल्यवान वस्तू' या प्रदर्शनाचे उद्घाटन केले.
सीबीआयसीचे अध्यक्ष विवेक जोहरी यांनी ' सीमाशुल्क विभागाची 60 वर्षे आणि या काळात सीमाशुल्क विभागाने जप्त केलेल्या मौल्यवान वस्तू' या प्रदर्शनाचे उद्घाटन केले.
विवेक जोहरी यांनी मुंबई सीमाशुल्क विभागाने जप्त केलेल्या वस्तूंचे 60 वर्ष जुने रजिस्टर पाहताना
मुंबई सीमाशुल्क विभागाने गेल्या काही वर्षांत जप्त केलेल्या वस्तू- विविध प्रकारचे अंमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक पदार्थ, विविध वन्य प्राण्यांच्या शरीराचे अवयव, कला आणि पुरातन वस्तू, सोने, हिरे, मौल्यवान घड्याळे, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू
'सीमाशुल्क विभागाची 60 वर्षे आणि या काळात सीमाशुल्क विभागाने जप्त केलेल्या मौल्यवान वस्तू' या विषयावर मुंबई सीमाशुल्क विभागाचे प्रदर्शन
1964 मध्ये राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित झालेले पहिले कस्टम अधिकारी मुंबईचे बापू लक्ष्मण लामखडे यांच्या फोटोला सीबीआयसी चेअरमन विवेक जोहरी यांनी पुष्पहार अर्पण केला.
यावेळी पश्चिम नौदल कमांडचे प्रमुख व्हाईस अॅडमिरल कृष्णा स्वामीनाथन, मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष राजीव जलोटा आणि मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्यासह मुंबई कस्टमचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. पाहुण्यांनी मुंबई कस्टम अधिकारी बापू लक्ष्मण लामखडे यांच्या फोटोला पुष्पहार अर्पण केला, ज्यांना 1964 मध्ये राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. तस्करांवर लामखडे यांची जरब होती तर कस्टम्सच्या अधिकार्यांना त्यांचा आदर वाटायचा.
सीमाशुल्क कायदा, 1962 हा एक उत्तम प्रकारे लिहिलेला लघु आणि सुलभ कायदा आहे ज्याने आपल्याला चांगली सेवा दिली आहे, असे या कार्यक्रमाचे उद्घाटन करताना लाहोरी यांनी सांगितले. या कायद्याचा पुढील प्रवास आणि इतिहास त्यांनी सांगितला. जो कायदा आपण जगतो आणि ज्याची शपथ घेतो तो कायदा साजरा करण्याचा आजचा उत्सव आहे, असे ते म्हणाले.
सीमाशुल्क विभागाने केलेल्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराबद्दल बोलताना ते म्हणाले की भारतीय सरकारी विभागांपैकी सीमाशुल्क विभाग आपली कामकाज प्रक्रिया संगणकीकृत करणारा पहिला विभाग आहे.
सीमाशुल्क कामाच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकताना त्यांनी सांगितले: “आम्ही मालवाहतूक सुलभीकरणात मोठा पल्ला गाठला आहे. महसूल संकलनावरचे आमचे लक्ष इतर प्राधान्यक्रमांकडे वळले आहे, प्रतिबंधात्मक किंवा तस्करीविरोधी मोहिमा, देशाच्या वेगवेगळ्या ठिकाणी सीमा व्यवस्थापन आणि सीमा नियंत्रणाचा भाग अजूनही खूप महत्त्वाचा आहे. आजच्या प्रदर्शनात आमचे काम चांगल्या पद्धतीने दिसते आहे. वर्षानुवर्षे आमच्या पद्धती बदलत गेल्या आहेत. तंत्रज्ञानाच्या वापरामुळे आमचे लक्ष्य अधिक तीव्र झाले आहे आणि प्रवाशांचे प्रोफाइलिंग अधिक चांगले झाले आहे.”
सीमाशुल्क विभाग आणि देशाला दिलेल्या गुणवत्तापूर्वक सेवेबद्दल मुंबई कस्टम्सचे सेवानिवृत्त अधिकारी आणि प्रतिष्ठित दिग्गज अधिकारी एस वाय मोरे, पी एम भास्करन नाईक, रोहित परदेशी, कोस्टाओ, फर्नांडिस, बाबूलाल गौतम, केएम मोईन, भरत यलगार्डे आणि रमाकांत यशवंत मोरे यांचा लाहोरी यांनी सत्कार केला. अधिकार्यांच्या प्रयत्नांचे कौतुक करताना ते म्हणाले, “आमच्या कामामुळे सरकारला महसूल तर मिळतोच त्याच बरोबर आपली अर्थव्यवस्था, समाज आणि सीमांचे संरक्षण करण्यास आणि आपल्या नागरिकांना सुरक्षित ठेवण्यासाठी आम्ही मदत करतो. सायकोट्रॉपिक ड्रग्सची तस्करी नियंत्रित करण्यासाठी आम्हाला मोठे यश मिळाले आहे. अशा मोहिमांसाठी आम्ही डेटा विश्लेषणाचा वापर सुरू केल्यानंतर काही मोठ्या जप्ती मोहिमा राबवण्यात आल्या आहेत. गॅलरी ऑफ ऑनरचा भाग असलेल्या आमच्या काही दिग्गजांचा सन्मान केल्याबद्दल मी मुंबई कस्टम्सचे आभार मानतो.”
* * *
PIB Mumbai | N.Chitale/P.Jambhekar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1881605)
Visitor Counter : 431