पर्यटन मंत्रालय

मुंबईत होणाऱ्या आगामी जी- 20 बैठकांच्या पार्श्वभूमीवर पर्यटन मंत्रालयाच्या मुंबईतील प्रादेशिक कार्यालयाने अतुलनीय भारत पर्यटक मार्गदर्शक तसेच प्रादेशिक मार्गदर्शकांसाठी केले कार्यशाळेचे आयोजन

Posted On: 07 DEC 2022 8:07PM by PIB Mumbai

मुंबई, 7 डिसेंबर 2022

 

मुंबईत होणाऱ्या आगामी जी- 20 बैठकांच्या पार्श्वभूमीवर पर्यटन मंत्रालयाने आपल्या मुंबईतील प्रादेशिक कार्यालयाच्या माध्यमातून अतुलनीय भारत पर्यटक मार्गदर्शक तसेच प्रादेशिक स्तरावरील मार्गदर्शकांसाठी आज अर्ध्या दिवसाची कार्यशाळा आयोजित केली होती. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या संयुक्त विद्यमाने ही कार्यशाळा घेण्यात आली.

पर्यटन मंत्रालयाने प्रमाणित केलेले 65 पर्यटक मार्गदर्शक कान्हेरी लेण्यांवरील सत्रात सहभागी झाले होते. 13 ते 16 डिसेंबर 2022 दरम्यान नियोजित जी 20 च्या पहिल्या कार्यगटाच्या बैठकीला उपस्थित राहणाऱ्या प्रतिनिधींच्या सहलीसाठी कान्हेरी लेणी या ठिकाणाची निवड झाली आहे.

कार्यशाळेत भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाचे अधीक्षक, पुरातत्व शास्त्रज्ञ राजेंद्र यादव आणि मुंबईच्या झेवियर्स महाविद्यालयाच्या इतिहास विभागप्रमुख डॉ. अनिता राणे कोठारे  यांचे 'कान्हेरी लेणींची कला आणि स्थापत्य' या विषयावर व्याख्यान झाले.

मुंबईतील नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्टच्या सभागृहात ही कार्यशाळा झाली. संबंधितांसह जी 20 बैठकीच्या तयारीचा एक भाग म्हणून ही कार्यशाळा झाली.

 

* * *

PIB Mumbai | N.Chitale/P.Jambhekar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1881599) Visitor Counter : 103


Read this release in: English