संरक्षण मंत्रालय
पोर्तुगालमध्ये आयोजित आंतरराष्ट्रीय व्हीलचेअर क्रीडा स्पर्धांमध्ये सुवर्णपदक जिंकत खडकी लष्करी रुग्णालयातील पॅराप्लेजिक रुग्णांनी प्राप्त केला गौरव
Posted On:
05 DEC 2022 8:22PM by PIB Mumbai
पुणे, 5 डिसेंबर 2022
भारतीय सशस्त्र दलाच्या सर्वात जुन्या आणि सर्वात मोठ्या पाठीचा कणा दुखापत उपचार केंद्रात (स्पायनल कॉर्ड इंज्युरी सेंटर) दाखल असलेल्या जवानांनी, पाठीच्या कण्याच्या दुखापतीनंतर अपंगत्वावर मात करत, पोर्तुगालच्या विला रिअल डी सॅंटो अँटोनियो येथे 23 - 29 नोव्हेंबर 2022 या कालावधीत झालेल्या आंतरराष्ट्रीय व्हीलचेअर आणि अँप्युटी स्पोर्ट्स (IWAS) जागतिक क्रीडा स्पर्धांमध्ये विजय मिळवत देशासाठी अभिमानास्पद कामगिरी केली.
W6CJ.jpg)
पॅराशूट रेजिमेंट विशेष दलाच्या सेना पदक प्राप्त हवालदार गोपाल सिंग यांनी पॅरा भालाफेक प्रकारात सुवर्णपदक आणि पॅरा गोळाफेक प्रकारात कांस्यपदक पटकावले. जीवन बदलवून टाकणाऱ्या पाठीच्या कण्यातील दुखापतीने आलेल्या शारीरिक अपंगत्वावर मात करण्याच्या वृत्तीने आणि कठीण काळात शांतपणे मार्ग काढत, खडकी लष्करी रुग्णालयात सांघीक कार्याद्वारे पॅराप्लेजियामुळे आलेल्या अपंगत्वाशी त्यांनी लढा दिला आणि देश आणि सशस्त्र दलांचा सन्मान वाढवला.

रेजिमेंट ऑफ आर्टिलरीमधील लान्स नाईक अभिजित पाटील यांनी पॅरा गोळाफेक प्रकारात मिळवलेले कांस्यपदक या स्पर्धेतील आणखी एक वैशिष्ट्य ठरले. खडकी लष्करी रुग्णालयात सर्वसमावेशक उपचार आणि पुनर्वसनासाठी दाखल असलेल्या अनेक राष्ट्रीय पॅरा अॅथलेटिक पदके जिंकणाऱ्या पाटील यांनी आपल्या चिकाटीने आंतरराष्ट्रीय मैदानावर यशाला गवसणी घातली. सैनिक सुधारणा कार्यक्रम (एसइपी) अंतर्गत रुग्णालयात दाखल असलेले पॅराप्लेजिक प्रकाश पिंगळे यांनी कठोर परिश्रम करत पॅरा गोळाफेक प्रकारात त्यांच्या श्रेणीत सहावे स्थान पटकावले.

कधीही हार न मानण्याची पॅराप्लेजिक सैनिकांची वृत्ती , खडकी लष्करी रुग्णालयातील पाठीचा कणा दुखापत उपचार केंद्रात (स्पायनल कॉर्ड इंज्युरी सेंटर) दाखल या रुग्णांसाठी सखोल प्रोटोकॉल आधारित पुनर्वसन कार्यक्रमाचा मार्ग मोकळा करते त्यानंतर त्यांना आर्मी पॅरालिम्पिक नोड (एपीएन ) येथे प्रशिक्षण देण्यात येते. पोर्तुगालमध्ये गेलेल्या तुकडीचा एक भाग असलेले एपीएनचे अनुभवी पॅरा ऍथलेटिक प्रशिक्षक नाईक रविंदर पनाघल यांनी पॅरा ऍथलीट्सच्या अप्रतिम कामगिरीबद्दल आनंद व्यक्त केला. रुग्णालयाचे कमांडंट ब्रिगेडियर टोनी जोस यांच्या नेतृत्वाखाली खडकी लष्करी रुग्णालयाच्या संपूर्ण वैद्यकीय पथकाने. उपचार करणाऱ्या चमूसाठी तसेच संपूर्ण देशासाठी अभिमानास्पद असे या रूग्णांचे हे मोठे यश साजरे केले.आंतरराष्ट्रीय व्हीलचेअर आणि अँप्युटी स्पोर्ट्स फेडरेशनच्या अंतर्गत आयडब्ल्यूएएस जागतिक क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
* * *
PIB Pune | M.Iyengar/S.Chavan/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1881045)
Visitor Counter : 174