संरक्षण मंत्रालय

मार्कोस - यूएसएन सील यांचा संयुक्त विशेष सैन्य सराव गोव्यात सुरू

Posted On: 04 DEC 2022 4:43PM by PIB Mumbai

 

'संगम' या भारतीय नौदलाचे मार्कोस आणि यू एस नेव्ही सील यांच्यातील संयुक्त नौदल विशेष दलांचा 7 वा सराव दिनांक 01 डिसेंबर 2022 पासून गोव्यात सुरू झाला. 'संगम' सर्वप्रथम 1994 मध्ये आयोजित करण्यात आला होता. हा सैन्य सराव दोन राष्ट्रांमधील एक लष्करी आणि मुत्सदेगिरीचा महत्वाचा उपक्रम असून तो दोन्ही राष्ट्रांमधील विश्वास आणि मैत्रीचे प्रतिबिंब आहे.

या वर्षीच्या सराव आवृत्तीत अमेरिकेतील सॅन डिएगो येथील सील टीम फाइव्हचे कर्मचारी आणि आयएनएस अभिमन्यूवरील भारतीय नौदल मार्कोस सहभागी झाले असून दोन्ही दले आपल्या विशेष सागरी मोहीमांच्या विविध पैलूंवरील कल्पना आणि अनुभवांची देवाणघेवाण करतील.

यू एस नेव्ही सील, मार्कोस आणि इतर सहभागी राष्ट्रांच्या नौदल विशेष दल संयुक्त सराव दरवर्षी 'मालाबार' चा एक भाग म्हणून आयोजित केला जातो, मात्र, सराव मालिका 'संगम' ही केवळ अमेरिका आणि भारतीय विशेष दलांमधील द्विपक्षीय सराव आहे. हा सराव तीन आठवड्यांच्या कालावधीसाठी नियोजित असून या दरम्यान दलाचे जवान मेरीटाईम इंटरडिक्शन मिशन, डायरेक्ट ॲक्शन मिशन्स, कॉम्बॅट फ्री फॉल जंप्स, स्पेशल हेलिबॉर्न ऑपरेशन्स आणि इतर विविध प्रकारांमध्ये कौशल्य पारंगत करतील.

***

N.Chitale/S.Mukhedkar/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1880843) Visitor Counter : 152


Read this release in: English