सांस्कृतिक मंत्रालय
वंदे भारतम नृत्य उत्सव-2023 क्षेत्रीय स्तरीय स्पर्धेचे 6 डिसेंबर रोजी नागपूरमध्ये आयोजन
Posted On:
03 DEC 2022 3:56PM by PIB Mumbai
वंदे भारतम नृत्य उत्सव-2023 चे नागपूरमध्ये 6 डिसेंबर रोजी आयोजन करण्यात येणार आहे. केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालय आणि संरक्षण मंत्रालयाच्या संयुक्त विद्यमाने नृत्य उत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे.
स्पर्धेसाठी पहिल्या टप्प्यात कलाकारांची निवड 17 आणि 18 नोव्हेंबर 2022 रोजी पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी, मुंबई येथे करण्यात आली. यात 130 कलाकारांची निवड केली. दुसरा टप्पा सिकंदराबाद येथे 27 नोव्हेंबर रोजी पार पडला. या टप्प्यात 73 कलाकारांची निवड करण्यात आली.
महाराष्ट्र, छत्तीसगढ़, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या चार राज्यांतील एकूण 203 कलाकार, 6 डिसेंबर 2022 रोजी आपली कला सादर करतील. याप्रसंगी सांस्कृतिक मंत्रालयाच्या संयुक्त सचिव श्रीमती संजुक्ता मुदगल यांची उपस्थिती असणार आहे.
क्षेत्रीय पातळीवर या स्पर्धेत निवड झाल्यानंतर नृत्य चमू तसेच वैयक्तिक कलाकार दिल्ली येथे आयोजित होणाऱ्या राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत सहभागी होतील. यात निवड झालेल्या कलाकारांना 2023 च्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यात कलाप्रदर्शनाची संधी मिळेल.
स्पर्धेत लोक नृत्य, आदिवासी नृत्य, शास्त्रीय नृत्य आणि समकालीन नृत्य, फ्यूजन नृत्य यांचा समावेश आहे. स्पर्धेतील कलाकार 17 ते 30 वयोगटातील आहेत. दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र नागपूर यांनी ही माहिती दिली आहे.
***
Source: SCZCC Nagpur
S.Thakur/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1880661)
Visitor Counter : 201