भूविज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

राष्ट्रीय ध्रुवीय आणि महासागर संशोधन केंद्र 1 डिसेंबर रोजी अंटार्क्टिका दिन करणार साजरा

Posted On: 30 NOV 2022 8:04PM by PIB Mumbai

पणजी, 30 नोव्हेंबर 2022

राष्ट्रीय ध्रुवीय आणि महासागर संशोधन केंद्र (एनसीपीओआर) दिनांक 1 आणि 2 डिसेंबर रोजी एक खुले अधिवेशन ('ओपन डे') आयोजित करून अंटार्क्टिका दिन साजरा करणार आहे.1959 मध्ये अंटार्क्टिक करारावर स्वाक्षरी केल्यानिमित्त आंतरराष्ट्रीय स्तरावर अंटार्क्टिका दिन साजरा केला जातो. गोव्याचे राज्यपाल, पी. एस. श्रीधरन पिल्लई अंटार्क्टिका दिन कार्यक्रमाचे उदघाटन करतील.

अंटार्क्टिका दिवसाच्या कार्यकमाद्वारे, एनसीपीओआर,विद्यार्थी आणि सामान्य नागरीकांशी संपर्क साधून, ध्रुवीय तसेच महासागरांच्या क्षेत्रात भारताच्या  प्रयत्नांबद्दल जनजागृती निर्माण करत त्यांचे महत्व अधोरेखित करण्यासाठी साजरा करते.विशेषतः शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी ध्रुवीय आणि महासागर विज्ञानाबद्दल उत्सुकता जागृत करण्यासाठी

या कार्यक्रमात  प्रदर्शन, लोकप्रिय विज्ञान चर्चा आणि 'वैज्ञानिकांशी प्रत्यक्ष भेट' अशा सत्राचा समावेश असेल. यावेळी गोव्याचे राज्यपाल, पोस्टमास्टर जनरल, गोवा क्षेत्र, सईद रशीद आणि एनसीपीओआरचे चे संचालक डॉ.थांबन मेलोथ यांच्या उपस्थितीत,भारतीय अंटार्क्टिक संशोधन केंद्रावर आधारीत खास तयार केलेल्या माय स्टॅम्प, विशेष टपाल कव्हर आणि भारती-भारतीय अंटार्क्टिक संशोधन केंद्रावरच्या   कॅन्सलेशन तिकिटाचे  प्रकाशन देखील करतील.

अंटार्क्टिका खंडात प्रशासन शक्य होईल,अशा प्रकारच्या आंतरराष्ट्रीय सहकार्याला अधोरेखित करण्यासाठी आणि शिक्षण अभ्यासक्रमात अंटार्क्टिका समाविष्ट करण्याला प्रोत्साहन मिळावे यासाठी दरवर्षी 1 डिसेंबर रोजी अंटार्क्टिका दिन साजरा केला जातो.

एनसीपीओआर विषयी माहिती:

राष्ट्रीय ध्रुवीय आणि महासागर संशोधन केंद्र ही (NCPOR) ध्रुवीय आणि दक्षिण महासागर ,क्षेत्रातील देशाच्या संशोधन कार्यांचे उत्तरदायित्व सांभाळणारी भारतातील प्रमुख संशोधन आणि विकास संस्था आहे. राष्ट्रीय ध्रुवीय आणि महासागर संशोधन केंद्र ही केंद्रीय भूविज्ञान मंत्रालयाच्या अखत्यारीतील भूसंशोधन करणारी एक स्वायत्त संस्था असून त्याचे मुख्यालय वास्को डी गामा, गोवा येथे आहे.

अंटार्क्टिक कराराबद्दल:

अंटार्क्टिका खंडामधील आंतरराष्ट्रीय उपक्रमांचे नियमन करणारी आणि तिथल्या मूळ वातावरणाचे संरक्षण करून या अनुपमेय बर्फाच्छादीत खंडाबद्दलचे ज्ञान सामायिक करून तेथे वैज्ञानिक कार्य करण्यासाठी अंटार्क्टिक करार प्रणाली कार्यरत आहे.याबद्दलच्या  प्रमुख करारावर दिनांक 1 डिसेंबर 1959 रोजी स्वाक्षरी करण्यात आली. शीतयुद्धादरम्यान झालेला हा पहिला शस्त्रास्त्र नियंत्रण करार होता, ज्यामुळे या खंडाचे वैज्ञानिक पद्धतीने जतन करण्यास तसेच तेथे वैज्ञानिक संशोधन करण्याचे स्वातंत्र्य प्रस्थापित केले गेले आणि तेथील लष्करी कारवायांवर बंदी घातली गेली.

 

  N.Chitale/S.Patgaonkar/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 

 

 

 

 

 

 


(Release ID: 1880093) Visitor Counter : 210


Read this release in: English