वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
ईसीजीसीने देशाचे जोखीम मानांकन मॉडेल अद्ययावत केले
Posted On:
30 NOV 2022 6:37PM by PIB Mumbai
मुंबई, 30 नोव्हेंबर 2022
सध्याची भू-राजकीय परिस्थिती आणि जागतिक व्यापारावरील त्यांचा प्रभाव या पार्श्वभूमीवर, निर्यात पत हमी महामंडळाने (ईसीजीसी) विविध देशांच्या व्यापार पत जोखीम प्रोफाइलचे सुधारित मूल्यांकन करण्याच्या उद्देशाने देशाचे जोखीम मानांकन मॉडेल अद्ययावत केले आहे, ज्याच्या आधारे निर्यातदारांना विविध विमा सुरक्षा कवच अंतर्गत संरक्षण उपलब्ध आहे.
360 दिवसांपेक्षा कमी पत कालावधीतले निर्यात व्यवहार म्हणजेच अल्प-मुदतीची निर्यात आणि मध्यम आणि दीर्घकालीन निर्यात म्हणजेच 360 दिवसांपेक्षा जास्त पत कालावधी असलेले निर्यात व्यवहार याच्याशी संबंधित देशाची जोखीम वर्गीकरणाची ताजी यादी कंपनीच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे - https://main.ecgc.in/english/circulars/.
सुधारित मानांकन 1 डिसेंबर 2022 पासून लागू आहे.
ईसीजीसीने आपल्या ग्राहकांना यापुढील कोणत्याही मदतीसाठी त्यांच्या सर्व्हिसिंग शाखेशी संपर्क साधण्यास सांगितले आहे.
N.Chitale/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1880057)
Visitor Counter : 153