अर्थ मंत्रालय
महसूल गुप्तचर संचालनालयाच्या मुंबई विभागीय युनिटने 20 कोटींचे कोकेन जप्त केले
Posted On:
24 NOV 2022 7:24PM by PIB Mumbai
मुंबई, 24 नोव्हेंबर 2022
मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय )मुंबई विभागीय युनिटने एका प्रवाशाकडून सुमारे 20 कोटी रुपयांचे कोकेन जप्त केले आहे.
24 नोव्हेंबर 2022 रोजी लागोसहून अदिस अबाबा मार्गे मुंबईला येणारा एक प्रवासी भारतात काही अंमली पदार्थाची तस्करी करणार असल्याची माहिती मुंबईच्या महसूल गुप्तचर संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी दिली होती, त्याआधारे मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर डीआरआय अधिकाऱ्यांच्या पथकाकडून पाळत ठेवली गेली.
विमानतळावर संशयित प्रवाशाला डीआरआय अधिकाऱ्यांच्या पथकाने ओळखले आणि त्याला अडवले. त्याच्या सामानाची कसून झडती घेण्यात आली आणि व्हिस्कीच्या 2 बाटल्या (प्रत्येकी 1 लिटर) जप्त करण्यात आल्या. अंमली पदार्थ शोध किटद्वारे बाटल्यांमधील व्हिस्कीची चाचणी केली असता त्यात कोकेनचा अंश असल्याचे निदर्शनास आले. लिक्विड कोकेनसह 2 बाटल्यांचे एकूण वजन अंदाजे 3.56 किलो एवढे आहे.
या बाटल्यांमध्ये असलेल्या द्रवामध्ये कोकेन अगदी कल्पकतेने विरघळवले होते आणि ते शोधणे अत्यंत कठीण होते.
ही एक अनोखी कार्यपद्धती डीआरआयने उघडकीस आणली आहे . डीआरआयच्या अधिकाऱ्यांना नियमितपणे देशात येणाऱ्या अंमली पदार्थांचा ओघ तपासण्यासाठी किती कठीण आव्हानांना सामोरे जावे लागते हे यावरून दिसून येते.
अवैध रित्या वाहतूक करण्यात आलेल्या या कोकेनचे आंतरराष्ट्रीय बाजार मूल्य 20 कोटी (अंदाजे) रुपयांपेक्षा जास्त आहे. यामागील आंतरराष्ट्रीय ड्रग स्मगलिंग जाळे उध्वस्त आणि प्रभावहीन करण्यासाठी या प्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे.
S.Kakade/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1878638)
Visitor Counter : 137