युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय

भारतीय यॉटिंग संघटनेच्या (वायएआय) वरिष्ठ गटाच्या राष्ट्रीय अजिंक्यपद 2022 स्पर्धेचा मुंबई येथे समारोप

Posted On: 21 NOV 2022 4:49PM by PIB Mumbai

मुंबई, 21 नोव्हेंबर 2022

भारतीय यॉटिंग संघटनेच्या(वायएआय) वरिष्ठ गटाच्या राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेचा 20 नोव्हेंबर 2022 रोजी समारोप झाला. पहिल्या दोन दिवसांत सातत्याने बदलत्या आणि हलक्या वाऱ्यामध्ये आणि नंतरच्या काळात मुंबई बंदर परिसरातील मध्यम स्वरूपाच्या वाऱ्यात  विजेतेपदासाठी या स्पर्धेत अतिशय चुरस पाहायला मिळाली. या वर्षीच्या  आशियाई स्पर्धांच्या निवड चाचणी स्पर्धांतील ही पहिली स्पर्धा होती. वरिष्ठ आशियाई स्पर्धा वर्गातील बोटींसाठी, वायएआय तसेच भारतीय नौदल नौकानयन संघटनेच्या अधिपत्याखाली 13 ते 20 नोव्हेंबर 2022 या कालावधीत मुंबई येथील आयएनडब्ल्यूटीसी अर्थात भारतीय नौदल वॉटरमनशिप प्रशिक्षण केंद्राच्या परिसरात ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या वर्गांमध्ये आयक्यूफॉईल (महिला आणि पुरुष फॉइलिंग विंड), एनएसीआरए 17 (मिक्स फॉइलिंग कॅटॅमॅरान), आयएलसीए 7 (पुरुष सिंगल-हँडेड डिंगी),आयएलसीए 6 (महिला सिंगल-हँडेड डिंगी), 470 (मिश्र), 49 ईआर (पुरुष स्किफ), 49 ईआरएफएक्स (महिला स्किफ) आणि आरएस:एक्स (महिला आणि पुरुष) या प्रकारांचा समावेश होता.

पुढच्या वर्षी चीनमध्ये होणाऱ्या आशियाई स्पर्धांसाठी निवड होऊन भारताचे प्रतिनिधित्व करण्याच्या उद्देशाने देशभरातील 14 नौकानयन क्लबचे प्रतिनिधित्व करणाऱ्या 114 नाविकांनी या स्पर्धेमध्ये अतिशय चुरशीचे दर्शन घडवले.

जागतिक नौकानयनात पात्र आंतरराष्ट्रीय शर्यत अधिकाऱ्यांसह स्पर्धेशी संबंधित सर्व अधिकारी, सिंगापूर, दक्षिण कोरिया आणि ओमान या देशांचे आणि अंतर मापक यांच्या पथकाने या शर्यतीचे योग्य स्वरुपात परिचालन आणि सर्व स्पर्धकांना एकाच पातळीवरुन स्पर्धेत खेळण्याची संधी यांची सुनिश्चिती केली.

मुंबई येथे आयएनडब्ल्यूटीसी  मध्ये 20 नोव्हेंबर 2022 रोजी झालेल्या स्पर्धेच्या समारोप समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून अतिविशिष्ट सेवा पदक,विशिष्ट सेवा पदक प्राप्त, पश्चिमी नौदल कमांडचे प्रमुख व्हॉईस डमिरल के. स्वामिनाथन उपस्थित होते. त्यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिकांचे वितरण करण्यात आले.

 

S.Patil/S.Chitnis/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 



(Release ID: 1877726) Visitor Counter : 152


Read this release in: English