संरक्षण मंत्रालय
एक्स्ट्राकॉर्पोरियल मेम्ब्रेन ऑक्सिजनेशन : ECMO 2022
Posted On:
19 NOV 2022 6:09PM by PIB Mumbai
आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ कार्डिओ थोरॅसिक सायन्सेस (AICTS), पुणे येथे एक्स्ट्राकॉर्पोरियल लाईफ सपोर्ट या विषयावर 19 नोव्हेंबर 2022 रोजी एक कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
एक्स्ट्राकॉर्पोरियल मेम्ब्रेन ऑक्सिजनेशन (ECMO) हे एक प्रगत तंत्रज्ञान आहे जे हिमोडायनामिक अस्थिरता असणाऱ्या गंभीर रुग्णांचे प्राण वाचवू शकते.
या कार्यक्रमाचे उद्घाटन सर्जन व्हाईस ॲडमिरल आरती सरीन, व्हीएसएम संचालक आणि कमांडंट आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेज (AFMC) यांच्या हस्ते करण्यात आले. ही कार्यशाळा दोन भागांमध्ये आयोजित करण्यात आली होती. पहिल्या भागात तज्ञांची व्यापक व्याख्याने झाली आणि त्यानंतर झालेल्या हँड्स ऑन सेशन्स कार्यक्रमाचे राष्ट्रीय स्तरावर थेट प्रसारण करण्यात आले आणि सर्व सहभागींना या तंत्रज्ञानाच्या सर्व पैलूंबद्दल प्रात्यक्षिकांसह माहिती देण्यात आली.

हे तंत्रज्ञान आत्मसात करण्यात आर्म्ड फोर्सेस मेडिकल सर्व्हिसेस (AFMS) आघाडीवर असून ECMO उपकरणे आता AFMS च्या देखभाल रुग्णालयात उपलब्ध आहेत. आर्मी कार्डियाक थोरॅसिक सायन्स (ACTS) हे कोविड रूग्णांसह गंभीर आजारी रूग्णांचे प्राण वाचवण्यासाठी या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आघाडीवर आहे आणि या प्रगत तंत्राचा वापर सुरू करणारे हे AFMS चे पहिले रुग्णालय आहे. AICTS कडे नवजात, बालके आणि प्रौढ रुग्णांमध्ये ECMO वापरण्याचा सर्वात मोठा अनुभव आहे म्हणूनच या कार्यशाळेच्या आयोजनासाठी हे एक आदर्श स्थान मानले गेले. आर्मी कार्डियाक थोरॅसिक सायन्सने या तंत्रज्ञानाचा वापर हृदय रोपण शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांमध्ये यशस्वीरीत्या केला आहे. या कार्यक्रमाला पन्नासहून अधिक बाहेर गावच्या प्रतिनिधींसह शंभरहून अधिक प्रतिनिधी उपस्थित होते.

यानंतर "हँड्स ऑन सेशन्स" कार्यक्रमात सर्व प्रतिनिधींना प्रात्यक्षिकांसह माहिती देण्यात आली. या प्रात्यक्षिकात चार ECMO स्टेशन स्थापन करण्यात आले ज्यात हार्डवेअरचा वापर, कॅन्युलेशन तंत्र, ECMO ची सुरुवात, ECMO ची देखरेख आणि परिधान या तंत्रज्ञानाच्या सर्व पैलूंचा समावेश होता. रुग्णांमध्ये कॅन्युलेशन तंत्राचे प्रात्यक्षिक करण्यासाठी अद्ययावत पुतळ्याचा वापर हे या कार्यशाळेचे विशेष आकर्षण होते. ECMO संसाधन सामग्रीशी जोडण्यासाठी एक QR कोड देखील व्युत्पन्न केला गेला आणि सर्व प्रतिनिधींना या प्रणालीत सहज प्रवेश मिळावा यासाठी हा QR कोड व्यापकपणे वितरित केला गेले. यासह हा कार्यक्रम गुगल प्लॅटफॉर्मद्वारे राष्ट्रीय स्तरावर थेट प्रक्षेपित करण्यात आला.
***
M.Iyengar/S.Mukhedkar/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1877304)
Visitor Counter : 144