ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
भारतीय मानक विभाग-BIS च्या मुंबई शाखा कार्यालय -II तर्फे मानक मंथन परिसंवादाचे आयोजन
प्रविष्टि तिथि:
18 NOV 2022 11:36PM by PIB Mumbai
भारतीय मानक विभागाच्या (देशाची राष्ट्रीय मानक संस्था) मुंबई शाखा कार्यालय -II ने, 18.11.2022 रोजी, BIS, पश्चिम क्षेत्रीय प्रयोगशाळा-मुंबई इथे मानक मंथन हा परिसंवाद आयोजित केला होता. या परिसंवादात, शुद्ध पोलादाने (स्टेनलेस स्टील) बनलेले बिनसांध्याचे (सिमलेस) पाईप आणि ट्यूबच्या सर्वसाधारण वापरासाठी नव्याने जारी केलेल्या, IS 17875:2022 या मानकावर चर्चासत्र झाले. या परिसंवादात सहभागी होऊन आपले बहुमोल अभिप्राय तसेच सूचना मांडण्यासाठी, BIS ने या विषयाशी संबंधित सर्व मंडळींना आमंत्रित केले होते. या परीसंवादात सीमलेस पाईप्सचे उत्पादक, चाचणी प्रयोगशाळा आणि ग्राहकांसह 15 विविध स्तरातील भागधारक उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे उद्घाटन, पश्चिम विभागाच्या उपमहासंचालक निशात एस. हक यांच्या हस्ते झाले. आपल्या भाषणात त्यांनी मानक मंथनाच्या म्हणजेच मानकावरील विचारविनिमयाच्या गरजेवर भर देत, भारतीय मानकांमध्ये आणखी सुधारणा करण्यासाठी सर्व उपस्थितांना, आपापले विचार मांडण्याची विनंती केली. उद्घाटनपर भाषणात BIS मुंबई शाखा कार्यालय-II चे प्रमुख संजय विज यांनी उपस्थितांना, BIS घ्या विविध उपक्रमांची माहिती दिली आणि IS 17875:2022 या नव्याने जारी केलेल्या मानकाबाबत स्पष्टीकरण दिले.

BIS चे उपसंचालक आशिष वाकळे यांनी, मानकाचे तपशील सादर केले आणि उपस्थितांना मानकाबाबत आपापल्या कल्पना सुचवण्याचे आवाहन केले. त्यांनी या मानकाची तांत्रिक वैशिष्ट्ये, उपस्थितांना तपशीलवार समजावून सांगितली. सर्व उपस्थितांनी मानक मंथनमध्ये सक्रिय सहभाग घेतला, म्हणजेच या मानकावर चर्चा केली आणि आपापले बहुमोल अभिप्राय नोंदवले. उपस्थितांनी मांडलेले अभिप्राय, सूचना आणि कल्पनांचा समावेश, भारतीय मानकांमध्ये योग्य पद्धतीने करण्यासाठी, ते BIS च्या तांत्रिक विभागाकडे पाठवले जाणार आहेत.

कार्यक्रमाची सांगता, मानक प्रचार अधिकारी पुष्पेंद्र मिश्रा यांच्या आभार प्रदर्शनाने झाली.
***
S.Patil/A.Save/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1877195)
आगंतुक पटल : 175
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English