दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

"भारतात डेटा केंद्रे, कंटेन्ट डिलिव्हरी नेटवर्क आणि आंतरजोडणी एक्सचेंजेसच्या स्थापनेद्वारे डेटा अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन देण्यासाठी नियामक चौकट विषयक शिफारसी ट्रायने केल्या प्रसिद्ध

प्रविष्टि तिथि: 18 NOV 2022 10:23PM by PIB Mumbai

 

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) ने आज 'डेटा केंद्र (DCs), कंटेंट डिलिव्हरी नेटवर्क्स (CDNs)आणि आंतरजोडणी एक्सचेंजेसच्या (IXPs) स्थापनेद्वारे डेटा अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन देण्यासाठीच्या आपल्या नियामक चौकट विषयक शिफारशी प्रसिद्ध  केल्या आहेत.

राष्ट्रीय डिजिटल संप्रेषण धोरण (एनडीसीपी) 2018 धोरण अंतर्गत, तरतूद क्रमांक 2.2(f).(i) मध्ये, "भारतात आंतरराष्ट्रीय डेटा केंद्रे, मजकूर वितरण नेटवर्क आणि स्वतंत्र आंतरजोडणी  एक्सचेंजेसच्या स्थापनेला प्रोत्साहन देण्यासाठी सक्षम नियामक चौकट  आणि प्रोत्साहने विकसित करणे" ही संकल्पना मांडण्यात आली आहे.

त्यानुसार, प्राधिकरणाने स्वतःहून या विषयावर सविस्तर सल्लामसलत माहितीपत्र  (सीपी) जारी केले आणि सल्लामसलत प्रक्रियेदरम्यान हितसंबधीतांकडून प्राप्त झालेल्या  सूचना /माहिती आणि मुद्द्यांचे  विश्लेषण विचारात घेतल्यानंतर,डेटा केंद्र,   मजकूर वितरण  नेटवर्क्स आणि आंतरजोडणी  एक्सचेंजेससह देशातील डिजिटल पायाभूत सुविधांना चालना देण्यासाठी प्राधिकरणाने या शिफारसींना अंतिम स्वरूप  दिले . ट्रायच्या www.trai.gov.in  या संकेतस्थळावर  या शिफारसी उपलब्ध आहेत. कोणत्याही स्पष्टीकरण/माहितीसाठीसंजीव कुमार शर्मा, सल्लागार (ब्रॉडबँड आणि धोरण विश्लेषण), ट्राय यांच्याशी  +91-11-23236119. या दूरध्वनी क्रमांकावरून  संपर्क साधला जाऊ शकतो.

***

S.Patil/S.Chavan/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 1877189) आगंतुक पटल : 254
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , हिन्दी