कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय

फेस ऑथेंटिकेशन तंत्रज्ञान वापरणाऱ्या जीवन प्रमाण ॲप निवृत्तीवेतनधारकांचे जीवन सुलभ करणारे


निवृत्तीवेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभागाची डिजिटल प्रमाणपत्र प्रचारासाठी देशव्यापी मोहीम

Posted On: 17 NOV 2022 3:00PM by PIB Mumbai

मुंबई, 17 नोव्हेंबर 2022

भारत सरकारच्या कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्तीवेतन मंत्रालययाअंतर्गत येणारा  निवृत्तीवेतन  आणि  निवृत्तीवेतनधारक  कल्याण विभाग आणि स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्या वतीने आज मुंबईत एसबीआय अणुशक्ती नगर शाखा येथे  निवृत्तीवेतनधारकांसाठी  डिजिटल जीवन प्रमाणपत्र सादर करण्यासंबंधीचे  शिबिर आयोजित  करण्यात आले होते. अंबरनाथमध्येही  काल  अशाच प्रकारचे एक दिवसाचे शिबिर आयोजित  करण्यात आले होते. जीवन प्रमाणपत्रे डिजिटल सादर करण्यासाठी फेस थेंटिकेशन तंत्रज्ञान वापरणाऱ्या जीवन प्रमाण पची निवृत्तीवेतनधारकांना ओळख करून देणे हा या शिबिरांचा उद्देश होता.

हे शिबीर म्हणजे, केंद्र सरकारी  निवृत्तीवेतनधारकांसाठी  डिजिटल जीवन प्रमाणपत्र  प्रचारासाठी  निवृत्तीवेतन आणि निवृत्तीवेतनधारक  कल्याण विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या देशव्यापी जनजागृती मोहिमेचा भाग आहे. 1 ऑक्टोबर 2022 पासून 61,00,000 हून अधिक निवृत्तीवेतनधारकांनी त्यांची डिजिटल जीवन प्रमाणपत्रे सादर केली आहेत. कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्तीवेतन  राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी नोव्हेंबर 2021 मध्ये  फेस ऑथेंटिकेशन तंत्रज्ञानाचा प्रारंभ केला होता.

शिबिरात, एसबीआय अर्थात स्टेट बँक ऑफ इंडियाच्या  स्वयंसेवकांनी निवृत्तीवेतनधारकांना त्यांच्या मोबाईल फोनचा वापर करून जीवन प्रमाण ॲपद्वारे डिजिटल पद्धतीने जीवन प्रमाणपत्रे सादर करण्याबाबत  मदत केली आणि मार्गदर्शन केले.

शिबिरात पथकाचे नेतृत्व, निवृत्तीवेतन  आणि  निवृत्तीवेतनधारक  कल्याण विभागाचे अवर सचिव  मनोज कुमार यांनी  केले.  त्यांनी सांगितले, पूर्वी, वृद्ध निवृत्तीवेतनधारकांना  प्रत्यक्ष स्वरूपात जीवन प्रमाणपत्र सादर करण्यासाठी बँकांबाहेर तासनतास रांगेत उभे राहावे लागे. आता, ते त्यांच्या घरून  आरामात एका बटणाच्या क्लिकवर त्यांचे जीवन प्रमाणपत्र डिजिटल पद्धतीने सादर  करू शकतात.

'जीवन प्रमाण' ही निवृत्तीवेतनधारकांसाठी  बायोमेट्रिक सक्षम डिजिटल सेवा आहे. केंद्र सरकार, राज्य सरकार किंवा इतर कोणत्याही सरकारी संस्थेचे निवृत्तीवेतनधारक या सुविधेचा लाभ घेऊ शकतात.

ॲप डाउनलोड करण्यासाठी :

Jeevan Pramaan :: Life Certificate for Pensioners ** DeitY ** Government of India

S.Bedekar/S.Kakade/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 



(Release ID: 1876763) Visitor Counter : 177


Read this release in: English