कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्र सरकारच्या निवृत्ती वेतन धारकांसाठी उद्या 11 नोव्हेंबर रोजी नागपूरात डिजिटल जीवन प्रमाणपत्र मोहीम

Posted On: 10 NOV 2022 6:52PM by PIB Mumbai

नागपूर, 10 नोव्हेंबर 2022

 

केंद्र सरकारच्या  निवृत्ती वेतन धारकांसाठी डिजिटल जीवन प्रमाणपत्राच्या प्रचारासाठी राष्ट्रव्यापी मोहीम केंद्रीय निवृत्ती वेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभागाद्वारे राबविली जात आहे. मागील वर्षाच्या नोव्हेंबर मध्ये केंद्रीय कार्मिक विभाग  राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंग  यांनी   स्मार्टफोनद्वारे जीवन प्रमाणपत्र सादर करण्याचे  ‘फेस ऑथेंटिकेशन तंत्रज्ञानाचे’  लोकार्पण  केले होते.  सर्व नोंदणीकृत पेन्शनर्स असोसिएशन, पेन्शन वितरण बँका,  केंद्रीय मंत्रालय/विभाग आणि  केंद शासन आरोग्य सेवा- सीजीएचस वेलनेस सेंटर यांसाठी विशेष शिबिरे आयोजित करून जीवन प्रमाणपत्र  दाखल करण्यासाठी ‘डिजिटल लाइफ सर्टिफिकेट-फेस ऑथेंटिकेशन’  तंत्राचा प्रचार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत . याच अनुषंगाने  केंद्र सरकारच्या  निवृत्ती वेतन धारकांसाठी ही मोहीम उद्या 11 नोव्हेंबर शुक्रवार  रोजी स्टेट बँक ऑफ इंडीया- एसबीआय,  सरदार वल्लभभाई पटेल मार्ग (किंग्सवे), नागपूर शाखा, येथे सकाळी 10 वाजेपासून आयोजित करण्यात येणार आहे .

यापूर्वी जीवन प्रमाणपत्र भौतिक स्वरूपात सादर करावे लागत होते आणि त्यासाठी वृद्ध पेन्शनधारकांना तासन्तास बँकेबाहेर रांगेत उभे राहावे लागत होते. आता,  एका बटणाच्या क्लिकसरशी  हे शक्य झाले आहे. मोबाईलद्वारे फेस ऑथेंटिकेशनद्वारे जीवन प्रमाणपत्र सादर करण्याच्या प्रक्रियेत  आधार क्रमांक, ओटीपीसाठी मोबाइल क्रमांक, पीपीओ क्रमांक, बँक/पोस्ट ऑफिसमधील खाते क्रमांक यासंबंधीचे तपशील आवश्यक आहे. ही सुविधा राज्य सरकारच्या कर्मचार्‍यांना आणि राज्याच्या कोषागार कार्यालयाच्या स्वरूपात वितरण  अधिका-यांमार्फत  देखील उपलब्ध आहे. केंद्र शासनाने सर्व निवृत्तीवेतनधारकांना त्यांचे जीवन प्रमाणपत्र डिजिटल मोडद्वारे सादर करण्यासाठी संबंधित केंद्राला भेट देण्याचे आवाहन केले आहे.

 

* * *

PIB Nagpur | S.Rai/D.Wankhede/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1875007) Visitor Counter : 148


Read this release in: English