अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

मुंबईत नरिमन पॉइंट येथील एअर इंडिया इमारत स्थित सीजीएसटी मुंबई दक्षिण आयुक्तालय येथे दक्षता जनजागृती सप्ताह-2022

Posted On: 08 NOV 2022 3:35PM by PIB Mumbai

मुंबई, 8 नोव्‍हेंबर 2022

 

भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आणि केंद्रीय दक्षता आयोग आणि केंद्रीय अप्रत्यक्ष कर मंडळाच्या निर्देशानुसार, सीजीएसटी मुंबई दक्षिण आयुक्तालय येथे 31.10.2022 ते 06.11.2022 दरम्यान “विकसित राष्ट्रासाठी भ्रष्टाचारमुक्त भारत” या संकल्पनेवर आधारित दक्षता जनजागृती सप्ताह – 2022 साजरा करण्यात आला.

दक्षता जनजागृती  सप्ताह 2022 च्या प्रारंभी,दक्षिण मुंबईच्या अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी  नरिमन पॉइंट  येथील  एअर इंडिया इमारतीच्या 15 व्या मजल्यावरील मुख्य कार्यालयाच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये आणि मेहेर बिल्डिंग आणि ओल्ड कस्टम हाऊस येथील कार्यालयांमध्ये एकतेची  शपथ घेतली.

1.11.2022 रोजी, एअर इंडिया सभागृहात दक्षता जनजागृती सप्ताह-2022 च्या  "विकसित राष्ट्रासाठी भ्रष्टाचारमुक्त भारत” या संकल्पनेवर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. यावेळी  न्यायमूर्ती (निवृत्त) अंबादास जोशी, लोकायुक्त, गोवा यांचे या संकल्पनेवर बीजभाषण  झाले. भ्रष्टाचाराविरोधात लढण्याच्या विविध  पैलूंवर त्यांनी आपले अनुभव आणि विचार मांडले. सीजीएसटी मुंबई विभागाचे मुख्य आयुक्त डी.के.श्रीनिवास, दक्षिण मुंबई सीजीएसटी संचालनालयाचे प्रधान आयुक्त  यू. निरंजन आणि लेखा आयुक्त  पी. मोहन राव हे देखील उपस्थित होते. चर्चासत्रादरम्यान , वक्त्यांनी भ्रष्टाचाराची राजकीय, आर्थिक आणि सामाजिक कारणे आणि त्याचा भारतीय अर्थव्यवस्थेवर होणारा दुष्परिणाम यांसारखे  विविध पैलू अधोरेखित केले.  तसेच अति सूक्ष्म आणि सूक्ष्म स्तरावर या धोक्याचा सामना करण्यासाठी मंत्रालय आणि विभागाने उचललेल्या पावलांचा  देखील उल्लेख करण्यात आला. कोविडच्या काळात सीजीएसटी विभागांनी डिजिटायझेशनवर अधिक लक्ष केंद्रित केले , त्यामुळे व्यापारातील कर्मचार्‍यांचा प्रत्यक्ष सहभाग  कमी होतो. यामुळे केवळ व्यापार सुलभ होत नाही तर विभागाच्या दैनंदिन कामकाजातही  पारदर्शकता वाढली आहे.

या सप्ताहादरम्यान, सीसीएस सीसीए नियम, 1965 आणि सीसीएस आचार नियम, 1964 बाबत माहिती देण्यासाठी आणि जनजागृती करण्याच्या उद्देशाने आयुक्तालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी प्रश्नमंजुषा, घोषवाक्य स्पर्धा , भित्तीपत्रिका स्पर्धांसह विविध उपक्रमांचे आयोजन  करण्यात आले होते जेणेकरून कर्मचार्‍यांमध्ये प्रामाणिकपणा आणि योग्यतेची भावना निर्माण होईल. या सर्व कार्यक्रमात सीजीएसटी मुंबई दक्षिण आयुक्तालयाचे अधिकारी आणि कर्मचारी उत्साहाने सहभागी झाले होते.

4.11.2022 रोजी मरीन लाईन्स येथे मुंबई दक्षिण आणि लेखापरीक्षण  आयुक्तालयाच्या अधिकारी आणि कर्मचार्‍यांच्या वॉकेथॉनने सप्ताहाचा समारोप झाला . यामधून  मोठ्या प्रमाणावर सामान्य जनतेपर्यंत “विकसित राष्ट्रासाठी भ्रष्टाचारमुक्त भारत”  हा संदेश पोहोचवण्यात आला. दक्षिण मुंबई सीजीएसटी आयुक्तालयाचे प्रधान आयुक्त  यू. निरंजन , सीजीएसटीचे अतिरिक्त आयुक्त राजीव गर्ग, सीजीएसटीच्या अतिरिक्त आयुक्त प्रियदर्शिका श्रीवास्तव , लेखा परीक्षण विभागाचे सह आयुक्त आनंद गोखले यांच्यासह वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.

 

* * *

PIB Mumbai | N.Chitale/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1874479) Visitor Counter : 200


Read this release in: English