वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय

सरकारचा स्पर्धात्मक, सहयोगी आणि सहकारी संघराज्यावर विश्वास आहे: इंडिया टुडे कॉन्क्लेव्हमध्ये केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांचे प्रतिपादन

Posted On: 05 NOV 2022 9:36PM by PIB Mumbai


सरकारचा स्पर्धात्मक, सहयोगी आणि सहकारी संघराज्यवादावर विश्वास आहे आणि राज्यांनी एकमेकांशी निकोप स्पर्धा केली तरच संपूर्ण देशाचा विकास होऊ शकतो, असे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी आज इंडिया टुडे कॉन्क्लेव्हमध्ये बोलताना सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारने आणलेल्या लोकशाही, राजकीय आणि संस्थात्मक स्थिरतेमुळे भारत जगभरातून अनेक गुंतवणूक प्रकल्पांना आकर्षित करत आहे, असेही त्यांनी सांगितले.


उद्योगांना प्रकल्पांच्या ठिकाणांबद्दल निर्णय घेण्यासाठी बराच वेळ लागतो तसेच राज्यातील सवलती आणि स्थिरता यासारख्या विविध घटकांचा त्यांच्या निर्णयांमध्ये सहभाग असतो, असे त्यांनी गुंतवणुकीबद्दल बोलताना सांगितले. राजकीय स्थैर्य नसणे, व्यवसाय करण्यास सुलभतेचा अभाव आणि उच्च पातळीवरील भ्रष्टाचार यामुळे गुंतवणुकीच्या संधी नष्ट होतात, असे ते पुढे म्हणाले.

  
***


S.Tupe/P.Jambhekar/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1874023) Visitor Counter : 133


Read this release in: English