संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

नवी दिल्ली येथे 7 ते 11 नोव्हेंबर 2022 दरम्यान आर्मी कमांडर्स परिषदेचे आयोजन 

Posted On: 05 NOV 2022 3:54PM by PIB Mumbai

 

आर्मी कमांडर्स कॉन्फरन्स (एसीसी) ही भारतीय सैन्याची एक सर्वोच्च स्तरीय द्विवार्षिक परिषद आहे. वैचारिक पातळीवरील विचारमंथनासाठी ही परिषद हे एक संस्थात्मक व्यासपीठ आहे. त्यात भारतीय सैन्यासाठी महत्त्वाचे धोरणात्मक निर्णय घेतले जातात. वर्ष 2022 साठी दुसरी परिषद नवी दिल्ली येथे 7 ते 11 नोव्हेंबर 2022 दरम्यान होणार आहे.

परिषदेदरम्यान, सध्याच्या/उभरत्या सुरक्षा आणि प्रशासकीय पैलूंवर भारतीय लष्कराचे सर्वोच्च नेतृत्व विचारमंथन करून भारतीय लष्करासाठी भविष्यातील वाटचाल ठरवेल. भविष्यातील सुसज्ज सैन्यासाठी परिवर्तनात्मक अत्यावश्यकता, क्षमता विकास आणि आधुनिकीकरणातील प्रगती, भारतीय सैन्याच्या वाढलेल्या मोहीम परिणामकारकतेसाठी रचनात्मक चौकट, आत्मनिर्भरतेला चालना देण्यासाठी अंतर्भूत केलेले बदल, नवीन मानव संसाधन व्यवस्थापन धोरणाची अंमलबजावणी आणि प्रगतीशील लष्करी प्रशिक्षणापुढील भविष्यातील आव्हाने यावर चर्चा होईल.

परिषदेदरम्यान 10 नोव्हेंबर 2022 रोजी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह लष्कराच्या कमांडर्सना संबोधित करणार आहेत आणि त्यांच्याशी संवादही साधणार आहेत. तीनही सेवा दलांच्या परस्पर समन्वयाला चालना देण्यासाठी चीफ ऑफ द डिफेन्स स्टाफ, भारतीय नौदल आणि भारतीय हवाई दलाचे प्रमुख भारतीय लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना  संबोधित करणार आहेत.

***

S.Kane/P.Jambhekar/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1873931) Visitor Counter : 172


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil , Telugu