उपराष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

भारतीय व्यक्तित्वाच्या केंद्रस्थानी  शेती असून ती आपली  परंपरा आणि  जीवनशैली आहे – उपराष्ट्रपती

Posted On: 04 NOV 2022 5:40PM by PIB Mumbai

शेती नेहमीच भारतीयत्वाच्या केंद्रस्थानी  राहिली असून एक राष्ट्र म्हणून आपल्या कृषी क्षेत्राचा विकास झाला तरच आपण समृद्ध होऊ शकतो. असे उपराष्ट्रपती  जगदीप धनखड  यांनी आज अधोरेखित केले.

आज चंदीगडमध्ये सीआयआय अॅग्रो टेक-2022 च्या उद्घाटनप्रसंगी  एका मेळाव्याला मार्गदर्शन करताना उपराष्ट्रपती म्हणाले की, शाश्वतता आणि अन्न सुरक्षा यांचा एकमेकांशी संबंध आहे. “शाश्वत कृषी पद्धतींशिवाय दीर्घकालीन अन्नसुरक्षा असू शकत नाही,” यावर त्‍यांनी भर दिला.

शेतीची भारतामध्‍ये परंपरा असून ती एक इथली जीवनशैली असल्याचे उपराष्ट्रपती धनखड यांनी सांगितलं. कृषी क्षेत्रात गेल्या 75 वर्षात केलेल्या प्रगतीचा संदर्भ देत त्यांनी आगामी काळात नवीन गरजा आणि नवीन आव्हानांनुसार आपली शेती करण्‍याची  गरज व्यक्त केली. ते पुढे म्हणाले, “नवोन्मेषी संकल्पना  हा कृषी विकासाचा मुख्य चालक बनला पाहिजे आणि आपल्या  शेतकऱ्यांना हवामान बदलांमुळे येणारे संकट आणि अन्नधान्यांच्या किंमतीमध्‍ये होत असलेल्या चढउतारांपासून संरक्षण मिळाले पाहिजे.”

आपल्या शेतकऱ्यांसाठी शाश्वत उत्पन्न निर्माण करण्याच्या गरजेवर भर देत उपराष्ट्रपतींनी अन्न प्रक्रिया आणि मूल्यवर्धनावर अधिक लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले.

2023 हे बाजरी- भरड धान्याचे आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून घोषित करण्याचा भारताचा प्रस्ताव संयुक्त राष्ट्राने एकमताने स्वीकारला आहे, असे नमूद करून  धनखड  म्हणाले की, अन्नटंचाई, पाणी टंचाई आणि अभूतपूर्व हवामान संकटांचा सामना करत असलेल्या जगात बाजरीच्या लागवडीवर लक्ष केंद्रित करणे हा एक स्मार्ट उपाय आहे.

सीआयआय अॅग्रो टेक -2022 चे उद्घाटन केल्यानंतर, उपराष्ट्रपतींनी पंजाब विद्यापीठाच्या तिस-या जागतिक माजी विद्यार्थी मेळाव्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लावली. यावेळी बोलताना त्यांनी आपण जे काही शिकलो, ते समाजाला परत देण्याचे महत्त्व अधोरेखित केले आणि  आपण समाजाला मोठ्या प्रमाणावर मदत केली पाहिजे असे सांगितले.

नालंदा सारख्या प्राचीन भारतातील नामांकित संस्थांचा संदर्भ देत  या देशाला गतवैभव पुन्हा मिळवून देण्याचे आवाहन त्यांनी शिक्षक, विद्यार्थी आणि माजी विद्यार्थ्यांना केले.

***

S.Kane/S.Bedekar/P.Kor

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

(Release ID: 1873771) Visitor Counter : 210